IPL 2026: ‘शाब्बास अर्जुन!’ मुलाच्या शानदार पदार्पणानंतर सचिन तेंडुलकर भावुक; पोस्ट करत म्हणाला…
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामन्यादरम्यान, क्षेत्ररक्षण करताना झेल घेण्यासाठी झेप घेताना बेथेलच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली. यामुळे, तो सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आरसीबीच्या शेवटच्या साखळी सामन्यात खेळला नाही. वैद्यकीय तपासणीनंतर, इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी पुढील मूल्यांकनासाठी जेकब इंग्लंडला परत जाईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने एक अधिकृत निवेदन जारी करत सांगितले की, ‘पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान जेकब बेथेलच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. यामुळे तो वैद्यकीय तपासणीनंतर, पुढील मूल्यांकनासाठी इंग्लंडला परत जाईल.’ जेकब बेथेलने आयपीएल २०२६ मध्ये ७ सामने खेळले आहेत. या सात सामन्यांमध्ये बेथेलने १२४.६७ च्या स्ट्राइक रेटने केवळ ९६ धावा केल्या. या हंगामातील त्याची सर्वोच्च धावसंख्या २७ होती.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) देखील जेकबच्या परत येण्याची पुष्टी केली आहे. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी त्याची उपलब्धता निश्चित करण्यासाठी मेडिकल टीपकडून बेथेलची काळजी घेतली जाईल.
आरसीबीने या हंगामात उत्कृष्ट कामगिरी करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र, प्लेऑफच्या अगदी आधी बेथेलचे संघातून बाहेर पडणे हा संघासाठी मोठे धक्का मानला जात आहे. दरम्यान, स्टार सलामीवीर फिल सॉल्टच्या पुनरागमनाने संघाला काहीसा दिलासा मिळाला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या क्वालिफायर १ साठी त्याला थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२६ क्वालिफायर १ सामना २६ मे रोजी धर्मशाळा येथे खेळला जाईल. या सामन्याचा विजेता थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.
MI vs RR: करो किंवा मरो लढत! वानखेडेवर धावांचा पाऊस की गोलंदाजांचा कहर? जाणून घ्या पिच रिपोर्ट






