KKR Vs RCB: Ajinkya Rahane's stormy half-century; Royal Challengers Bangalore bowlers were washed away..
KKR Vs RCB : आजपासून आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामास सुरवात झाली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स प्रथम फलंदाजीला मैदानात उतरला आहे. केकेआरचा नवीन कर्णधार अजिंक्य रहाणेने आपल्या बॅटने तुफानी फटकेबाजी करत अर्धशतक धोकले आहे. त्याचा सहकारी सुनील नरेनने देखील 26 चेंडूत 44 धावा केल्या आहेत. डावातील 17 ओव्हर असून केकेआरने 155 धावा केल्या असून 6 विकेट्स गमावल्या आहेत. रमणदीप सिंग आणि अंगकृष रघुवंशी खेळत आहेत.
केकेआरकडून कर्णधार अजिंक्य रहाणेने आयपीएल २०२५ चे पहिले अर्धशतक झळकावले आहे. रहाणेने २५ चेंडूत अर्धशतक ठोकून हंगामाची तुफानी सुरुवात केली. त्याला कृणाल पंड्याने माघारी पाठवले. रहाणेने 31 चेंडूत 56 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार लगावले आहेत.
आयपीएल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कर्णधार अजिंक्य राहणेने आक्रमक खेळीचं दर्शन घडवलं आहे. अवघ्या 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. 6 चौकार आणि 4 षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलंया आहे. शांत संयमी अजिंक्य रहाणेचा आक्रमक अंदाज पाहून प्रत्येक जण हैराण झाले आहेत. कोलकात्याचं कर्णधारपद भूषवताना त्याच्यात आक्रमकपणा दिसेल का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले होते. पण पहिल्याच सामन्यात अजिंक्य रहाणेने आपला रुद्रावतार दाखवत सर्वांची तोंड बंद केली आहेत.
आरसीबीचा प्लेइंग 11
विराट कोहली, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल
केकेआरचा प्लेइंग 11
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, सुनील नारायण, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
आयपीएल २०२५ चा १८ वा हंगाम आज २२ मार्चपासून सुरू होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पहिला सामना खेळला जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहेत. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघाचे वेळापत्रक पुन्हा व्यस्त होणार आहे. अशातच आयपीएल 2025 च्या सुरुवातीलाच टीम इंडियाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे पुढील चक्र देखील सुरू होईल.