
केकेआरला विजयासाठी 166 धावांची गरज (Photo Credit- X)
SRH have been bowled out for 165 after a remarkable comeback from KKR bowlers! 💜🔥 Will they defend this total, or KKR register their third victory of the season? 🧡🍿#IPL2026 #SRHvKKR #Sportskeeda pic.twitter.com/JP6NGcDMuq — Sportskeeda (@Sportskeeda) May 3, 2026
सनरायझर्स हैदराबादची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. अभिषेक शर्माने केवळ 15 धावा केल्या होत्या, तेवढ्यात कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर कॅमेरॉन ग्रीनने त्याला झेलबाद केले. त्यानंतर, ट्रॅव्हिस हेड आणि ईशान किशन यांनी दुसऱ्या गड्यासाठी 61 धावांची भागीदारी रचली. हेडने अवघ्या 28 चेंडूंमध्ये 61 धावांची धडाकेबाज खेळी केली; या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. अखेरीस, वरुण चक्रवर्तीच्या फिरकी गोलंदाजीचा बळी ठरत हेड बाद झाला.
Rajasthan Royals विकली गेली रे..! तब्बल १५,६६० कोटींना झाला फ्रँचायझीचा ताबा; कोण आहे हा नवा ‘किंग’?
हेनरिक क्लासेन (11 धावा), स्मरण रविचंद्रन (4 धावा), अनिकेत वर्मा (6 धावा) आणि सलिल अरोरा (2 धावा) यांनी फलंदाजीत अत्यंत निराशा केली. ईशान किशन खेळपट्टीवर स्थिरावला होता, परंतु त्याला मोठी खेळी साकारता आली नाही; त्याने 29 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या, ज्यामध्ये ४ चौकार आणि 2 षटकारांचा वाटा होता. कर्णधार पॅट कमिन्सला केवळ 10 धावाच करता आल्या आणि आठवा बाद होणारा फलंदाज म्हणून तो तंबूत परतला.
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंग्रिश रघुवंशी (विकेटीकपर), कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल, एशान मलिंगा
चला पॅकअप करा! साधं जिंकताही आलं नाही; CSK ने MI ला चारली धूळ, प्ले ऑफचं स्वप्न भंगलं