MI Vs CSK Live Streaming (फोटो- ट्विटर)
मुंबई इंडियन्सने चेन्नईला दिले 160 रन्सचे टार्गेट
नमन धीरचे केली शानदार अर्धशतकी खेळी
Tata IPL 2026 MI Vs CSK Live Updates: आज चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सामना पार पडला. हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये 150 रन्स करून चेन्नईच्या संघाला 160 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफ मध्ये जाण्याचे स्वप्न आता जवळपास अशक्य झाले आहे.
चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी
मुंबई इंडियन्सने दिलेल्या 160 रन्सचा पाठलाग करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जकडून संजू सॅमसन आणि उर्वील पटेलने सुरुवात केली. संजू सॅमसन गेल्या काही सामन्यांमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये होता. मात्र आजच्या सामन्यात तो केवळ 37 रन्सची खेळी तो आउट झाला. तर उर्वील पटेलने 12 बॉलमध्ये 24 रन्सची खेळी केली.
त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि कार्तिक शर्माने चेन्नईच्या संघाची कमान हातात घेतल्याचे पाहायला मिळाले. दोघांनी आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला विजय मिळवून दिला.
MI Vs CSK Live: नमनने पलटणला दिला ‘धीर’; चेन्नईला विजयासाठी 160 रन्सची आवश्यकता
मुंबई इंडियन्सची गोलंदाजी
मुंबई इंडियन्सकडून ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहने सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने संजू सॅमसनची विकेट घेतली. तर ए.एम. गझनफरने उर्वील पटेलची विकेट घेतली.
मुंबई इंडियन्सची फलंदाजी
कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रियान रिकल्टन आणि विल जॅक्सने मुंबई पलटणच्या डावाची सुरूवात केली. मात्र विल जॅक्सने आजच्या सामन्यात चांगली खेळी करू शकला नाही. 5 बॉलमध्ये केवळ 1 रन करून तो आउट झाला. त्यापाठोपाठ रियान रिकल्टने 37 रन्सची खेळी केली.
Continuing his good form in yellow 💛 2️⃣2️⃣nd #TATAIPL Fifty for Ruturaj Gaikwad 👏#CSK need 38 runs from 36 deliveries in the chase Updates ▶️ https://t.co/VVAjldiiC0#KhelBindaas | #CSKvMI | @ChennaiIPL | @Ruutu1331 pic.twitter.com/wlQlA6IvKt — IndianPremierLeague (@IPL) May 2, 2026
नमन धीर आणि सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरला. सूर्यकुमार यादव 21 रन्स करून आउट झाला. तर तिलक वर्माने 8 बॉलमध्ये 5 रन्स केल्या. तिलक वर्माने आज साजेशी खेळी केली नाही. रॉबिन मिन्झने येताच पहिल्या बॉलवर फोर मारला. मात्र तो 5 रन्स करून आउट झाला. मुंबई इंडियन्ससाठी आजचा सामना महत्वाचा आहे. पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी असलेल्या मुंबईला प्ले ऑफमध्ये यायचे असेल तर आजचा आणि यापुढील सर्व सामने जिंकणे अनिवार्य असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सला दोन धक्के दिले. अंशूल कंबोजने विल जॅक्सची विकेट घेतली. तर नूर अहमदने तिलक वर्मा आणि रियान रिकल्टनची विकेट घेतली. त्यापाठोपाठ रामकृष्णा घोष या नवख्या गोलंदाजाने सूर्यकुमार यादवची विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन (ऑलराउंडर),अकील होसेन, नूर अहमद, अंशुुल कंबोज, गुरजपनीत सिंग, एम. एस. धोनी , आयुष म्हात्रे, उर्विल पटेल.
भाई का स्वॅग है! KL राहुलने मोडल ‘Rohit- Kohli ‘चा ‘हा’ रेकॉर्ड; आयपीएलचा नवा बॉस
मुंबई इंडियन्सची संभाव्य टीम: रोहित शर्मा, विल जॅक्स, हार्दिक पांड्या (कर्णधार), रायन रिकलटन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, मिचेल सँटनर, अल्लाह गझनफर, जसप्रीत बुमराह , अश्वनी कुमार, दानिश मालेवार.






