Ind Vs Aus: Father-in-law delighted with KL Rahul's innings, 'that' six also charmed his wife; praise is pouring in..
मुंबई – चॅम्पियन्स ट्रॉफीचा 2025 चा सेमी फायनल सामना 4 मार्च 2025 रोजी दुबई येथे खेळवण्यात आला. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने उभे ठाकले होते. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 4 विकेट्सने पराभूत करून थेट अंतिम फेरीत धडक मारली. शेवटचे टप्प्यात खेळ रंगात येत असताना विजयी चेंडू केएल राहुलने सीमारेषेबाहेर टोलवला आणि भारताने मोठ्या दिमाखात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. आता केएल राहुलच्या दमदार खेळीच सर्वत्र कौतुक होत असून सासरे सुनील शेट्टी यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 मार्चला सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय प्राप्त करून फायनलमध्ये पोहचला. ऑस्ट्रेलियाने भारताला 265 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात विराट कोहलीने केलेली 84 धावांची खेळी महत्वाची ठरली. तसेच केएल राहुलच्या संयमी खेळीने भारताचा विजय सुखर केला. त्याने विजयी षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला. त्याच्या खेळीचे आता कुटुंबासह सर्व स्तरावर कौतुक होत आहे. केएल राहुलने 33 चेंडूमध्ये 36 धावा केल्या आणि 48.1 षटकांत सामना संपवला.
केएल राहुल भारतीय संघासाठी जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी करत असतो तेव्हा त्याची पत्नी अथिया शेट्टीसह सासरे सुनील शेट्टी नहेमीच आनंद साजरा करत असतात. असाच आनंद केएल राहुलने चॅम्पियन्स ट्रॉफीचा 2025 च्या सेमी फायनल सामन्यात विजयी षटकार लावल्यावर साजरा करण्यात आला आहे. सुनील शेट्टी यांनी इन्स्टाग्रामवर आयसीसीची एक रील शेअर केली आहे. रीलमध्ये जावई राहुल षटकार लगावतना दिसत आहे. त्यावेळी ते पाहून काही लहान मुलं स्टेडियममध्ये आनंदाने उड्या मारत आहेत. या अभिनेत्याकडून नजर बट्टू आणि ब्लॅक हार्ट इमोजी बनवून आपला आनंद व्यक्त करण्यात आला. त्याच प्रकारे राहुलची पत्नी अथिया शेट्टीनेही रेड हार्ट इमोजीद्वारे आपल्या पतीवर प्रेमाचा वर्षाव केल्याचे दिसून येत आहे.
अभिनेता सुनील शेट्टीसाठी हा क्षण दुहेरी आनंद देणारा आहे. कारण, एकीकडे जावई केएल राहुलने आपल्या कामगिरीने भारतीय संघाला फायनलमध्ये पोहोचवलं आहे. तसेच, एप्रिल महिन्यात तो सुनील शेट्टी आजोबा होणार आहे आणि राहुल बाप होणार आहे. अभिनेत्री अथिया शेट्टी तिच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. मागील वर्षी 2024 मध्ये, राहुल आणि आथिया या जोडप्याकडून बाळाच्या आगमनाची बातमी सर्वांना सांगण्यात आली होती.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती
ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अॅडम झांपा, तनवीर संघा