SA vs NZ : Kane Williamson ने घातला धावांचा रतीब; केला 'हा' रेकॉर्ड, असं करणारा न्यूझीलंडचा ठरला पहिलाच खेळाडू..(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
SA vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा दुसऱ्या सेमी फायनल सामना आज (5 मार्च) लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत 6 गडी गमावून 362 धावा केल्या आहेत. यामध्ये रचीन रवींद्रसह केन विल्यमसनने शतके ठोकली आहेत. केन विल्यमसनने 102 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात केन विल्यमसनने ही कामगिरी केली आहे.
लाहोर मधील गद्दाफी स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात विल्यमसनला 27 धावांची गरज होती आणि केशव महाराजने टाकलेल्या सामन्याच्या 19 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक धाव पूर्ण करत त्याने हा इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा विल्यमसन हा क्रिकेट जगातील 16 वा फलंदाज ठरला आहे. केन विल्यमसनने आपल्या 384व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि 440व्या डावात 19 हजार धावांचा आकडा गाठला आहे.
केन विल्यमसन : 19,000*
रॉस टेलर : 18,199
स्टीफन फ्लेमिंग : 15,289
ब्रेंडन मॅक्युलम :14,676
मार्टिन गुप्टिल : 13,463
विराट कोहली (भारत) : 399 डाव
सचिन तेंडुलकर (भारत) :432 डाव
ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) : 433डाव
केन विल्यमसन (न्यूझीलंड) : 440 डाव
जो रूट (इंग्लंड) : 444 डाव
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) : 444 डाव
भारताचा विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 19 हजार धावा करणारा जगातील सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या 399 व्या डावात ही कामगिरी करून दाखवली आहे. या यादीत कोहलीनंतर सचिन तेंडुलकर (432 डाव) आणि वेस्ट इंडिजचा महान ब्रायन लारा (433) यांचा नंबर येतो. इंग्लंडचा जो रूट आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग यांनी 444 व्या डावात 19 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, एडन मार्कराम, विआन मुल्डर, मार्को जॉन्सन, केशव महाराज, केशवजी महाराज, एन.
विल यंग, रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (क), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विलियम ओ’.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 मार्चला सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय प्राप्त केला आहे. या विजयाने भारत थेट फायनलमध्ये पोहचला आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. विराट कोहलीने केलेली 84 धावांची खेळी महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाने भारताला 265 धावांचे लक्ष्य दिले होते.