
Kho-Kho: महाराष्ट्राचा सुपुत्र ओजस बनला ऑस्ट्रेलियन खो -खो संघाचा कर्णधार; विश्वचषक स्पर्धेत करणार नेतृत्व
इचलकरंजी: लहानपणापासूनच वडीलांकडून खो -खो खेळाचे धडे शिकलेल्या आणि मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीचा आणि सध्या ऑस्ट्रेलियात अंतराळ संशोधक म्हणून काम पाहणाऱ्या ओजस किरण कुलकर्णी हा ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया खो खो संघाचा कर्णधार म्हणून खेळणार आहे. लहानपणापासूनच खो-खो ची भुरळ असलेल्या ओजसने वर्ड कप खो -खो चे सामने होणार असल्याचे समजतात ऑस्ट्रेलियातील तीन शहरातील खेळाडूंना एकत्र केले. त्यांना खो-खो खेळ आणि त्याबाबतचे प्रशिक्षण दिले आणि त्याची एकूण मेहनत आणि खेळातील गुणवत्ता पाहून ऑस्ट्रेलिया खो-खो असोसिएशनने त्याची ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून निवड केली.
ऑस्ट्रेलिया स्पेस एजन्सी आणि नासा यांनी संयुक्तपणे एक मिशन तयार केले असून या मिशन मधील एका प्रोजेक्टचा हेड म्हणून सध्या ओजस कार्यरत आहे.त्याचा प्रवास नक्कीच अनेकांना प्रेरणादायी असा आहे. ओजस यांचे वडील किरण कुलकर्णी हे इचलकरंजी येथील जय हिंद मंडळाचे खो-खो पटू. वडिलांच्या बरोबर ओजस हाही सहावी ते दहावी शिकत असताना जय हिंद मंडळावर खोखो खेळण्यासाठी जात होता.
इचलकरंजी येथील डी के टी इन्स्टिट्यूट मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळाला. खेळाचे इंटर युनिव्हर्सिटीचे कर्णधार पदही भूषवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याची इमर्सन या कंपनीत निवड झाली. परंतु आपणाला अजूनही पुढील उच्च शिक्षण घ्यावं असं त्याला वाटू लागले आणि उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलिया येथील कर्टीन युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. एम एस ही पदवी घेतल्यानंतर ओजस यांनी एडलेस येथे स्पेस टेक्नॉलॉजी या ठिकाणी संशोधक म्हणून काम केले. त्यानंतर लिक्विड इन्स्ट्रुमेंट या स्पेस टेक्नॉलॉजीशी संशोधन करणाऱ्या कंपनीमध्ये ते रुजू झाले.
प्रशिक्षक आणि कर्णधार
या खेळासाठी फारसे साहित्य लागणारच नव्हते. त्या ठिकाणी रब्बी खेळासाठी 15 ते 16 फूट जे पोल होते त्यावरच खो-खो चा सराव सुरू झाला. प्रशिक्षणाचे काम ओजस याने सहजपणे पार पाडले. पुरुष संघाची तयारी करून घेतली जात असताना महिला संघासाठी स्वतंत्र असे प्रशिक्षक त्या ठिकाणी शक्यच नव्हते. त्यामुळे महिला संघाला प्रशिक्षण देण्याचे काम ही ओजस यांनीच पार पाडले.
संघात आठ भारतीय खेळाडू