Kuldeep Yadav (Photo Credit- X)
Kuldeep Yadav Press Conference: आशिया कप २०२५ मध्ये भारतीय संघाच्या उत्कृष्ट कामगिरीमध्ये फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा (Kuldeep Yadav) मोठा वाटा आहे. त्याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले असून, आतापर्यंत दोन सामन्यांमध्ये त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळाला आहे. पण, मैदानाच्या बाहेरही त्याचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. ओमानविरुद्धच्या सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत कुलदीपने एका पत्रकाराला असे मजेशीर उत्तर दिले की, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पत्रकाराने कुलदीपला विचारले की, ‘तुम्हाला कधी वाटते की तुमच्या हातातून चेंडू चांगला निघत आहे?’ यावर कुलदीपने मिश्किलपणे उत्तर दिले, “हे मी तुम्हाला का सांगू भाऊ?” कुलदीपच्या या उत्तरामुळे संपूर्ण पत्रकार परिषदेत हशा पिकला. या स्पर्धेत कुलदीपचे प्रदर्शन खूपच प्रभावी राहिले आहे. यूएईविरुद्ध त्याने ५७ धावांत ४ विकेट्स घेतल्या, तर पाकिस्तानविरुद्ध त्याने ३ महत्त्वाच्या विकेट्स घेऊन त्यांना १२७ धावांवर रोखले. दोन्ही सामन्यांमध्ये त्याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले.
पाहा व्हिडिओ
Indian spinner Kuldeep Yadav praised Shaheen Afridi for contributing with the bat.#TOKInAsiaCup #ShaheenShahAfridi pic.twitter.com/IukZcZolQS
— TOK Sports (@TOKSports021) September 18, 2025
या मजेदार उत्तरांनंतर कुलदीपने क्रिकेटबद्दलचे आपले विचारही शेअर केले. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता, तेव्हा तुम्ही फलंदाजाला वाचता. चांगले फलंदाज असतील तर तेही चांगले खेळतात. शाहीन आफ्रिदी सध्या चांगली कामगिरी करत आहे. तो गेल्या २ सामन्यांपासून खूप चांगली फलंदाजी करत आहे.”
तो पुढे म्हणाला, “लहान-लहान चुका होतात, तेव्हा तुम्ही अधिक चांगले करू शकलो असतो असे वाटते. खेळ असाच असतो, जेव्हा तुम्ही अपयशी ठरता तेव्हाच शिकता. त्यामुळे प्रत्येक सामना परिपूर्ण नसतो आणि प्रत्येक सामना अपयशही नसतो. तुम्ही त्यातून सुधारणा करत शिकत राहता. गोलंदाजीत तुम्ही ५ किंवा ६ विकेट्स घेतल्या तरीही, तुम्ही अधिक चांगली कामगिरी करावी अशीच अपेक्षा असते.”
पाकिस्तानने यूएईला ४१ धावांनी हरवल्यामुळे आता सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. हा सामना २१ सप्टेंबर, रविवारी खेळला जाईल. मागील सामन्यात भारताने पाकिस्तानला ७ विकेट्सनी हरवले होते, आणि यावेळीही सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार असेल.