
IND vs SL: भारताचा पहिला डाव ४६२ वर संपला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीदेखील हवामान चिंताजनक राहण्याची शक्यता आहे. AccuWeather च्या अहवालानुसार, सकाळी पावसाची शक्यता आहे. परिणामी, दुसऱ्या दिवसाप्रमाणेच खेळाच्या सुरुवातीला विलंब होऊ शकतो. त्यामुळे नक्की या कसोटीचा निकाल कसा लागणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. भारताच्या संघाने पहिल्या डावात चांगली कामगिरी केली असून आता गोलंदाजाच्या कामगिरीवर सगळे अवलंबून आहे.
🚨 1st Test INDIA vs SRI LANKA 🚨 🔹 𝐃𝐀𝐘 𝟑 | 𝐈𝐍𝐍𝐈𝐍𝐆𝐒 𝐁𝐑𝐄𝐀𝐊 🔹 INDIA 🇮🇳 : 4️⃣6️⃣2️⃣-🔟 (116.4)
– Devdutt Padikkal : 167 (230)
– KL Rahul : 82 (175) • Prabath Jayasuriya : 4-109 (39)#SLvIND #INDvsSL #Test #Cricketpic.twitter.com/hKa1fvLbWu https://t.co/hKa1fvLbWu https://t.co/nnjWvIODjZ — Cricket Lover 🏏 (@Crick97924Lover) August 17, 2026
भारतीय संघ ४६२ धावांवर सर्वबाद झाला. भारताची शेवटची, म्हणजेच १० वी विकेटही प्रसिद्ध कृष्णाची घेण्यात आली. त्याने जास्त धावा केल्या नाहीत आणि तो जास्तवेळ खेळपट्टीवर टिकूदेखील शकला नाही. त्याने सामन्यात केवळ २ धावा केल्या, तर कुलदीप यादव १३ धावांवर नाबाद राहिला. आता श्रीलंकेचे खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरतील आणि भारतीय संघाच्या गोलंदाजांवर मोठी जबाबदारी असेल.
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेतील पहिल्या कसोटीत देवदत्त पडिक्कलला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याने २३० चेंडूंमध्ये १५ चौकार आणि एका षटकारासह १६७ धावांची शानदार खेळी केली. देवदत्त पडिक्कलने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध आपली पहिली कसोटी खेळली. त्यानंतर त्याच वर्षी त्याला आपला दुसरा सामना खेळण्याची संधी मिळाली. आता कुठे त्याला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. देवदत्तला हे देखील माहित आहे की आपली पाळी पुन्हा कधी येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे त्याने या संधीचे सोने केले.