क्रिकेट विश्वातील प्रतिष्ठित समजली जाणारी आशिया कप (Asia Cup) स्पर्धा २७ ऑगस्टपासून सुरु होत आहे. या सामान्यांचे वेळापत्रक देखील जाहीर झाले असून यंदाचे सामने हे युएई मध्ये खेळवले जाणार आहेत. या आशिया कपसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून यात भारतीय संघाचे कर्णधारपद रोहित शर्मा (Rohit sharma) तर उपकर्णधार पद हे लोकेश राहुल (Lokesh Rahul) कडे देण्यात आले आहे. मात्र १५ सदस्यीय भारतीय संघात खेळण्यासाठी लोकेश राहुल यूएईला जाणार की, नाही, याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होईल. याच कारण आहे ते म्हणजे लोकेश राहुलच्या फिटनेसबद्दल असणारी साशंकता.
आशिया कप स्पर्धेसाठी संघासोबत यूएईला जाण्याआधी केएल राहुलला फिटनेस टेस्ट मध्ये पास करावी लागणार आहे. बीसीसीआयची टीम NCA मध्ये लोकेश राहुलची फिटनेस टेस्ट करणार आहे. केएल राहुल आयपीएल २०२२ नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्याला आधी ग्रोइनची दुखापत झाली होती. त्यानंतर कोरोनाची लागण झाली. राहुल आता यातून रिकव्हर झाला आहे, असं वृत्त एनसीए मधील सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. पण त्याची अधिकृत फिटनेस टेस्ट अजून बाकी आहे. बीसीसीआयचे फीजियो शक्यतो, पुढच्या आठवड्यात राहुलची फिटनेस टेस्ट घेतील. बीसीसीआयच्या च्या सुत्रांनुसार, “केएल राहुल दुखापतीमधून पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळेच त्याची संघात निवड करण्यात आली. पण प्रोटोकॉलनुसार, त्याची फिटनेस टेस्ट घ्यावी लागेल. तो बंगळुरुत फिटनेस टेस्ट देईल”
फिटनेस टेस्ट पास न झाल्यास राहुलच्या जागी श्रेयस अय्यर येणार :
लोकेश राहुल फिटनेस टेस्ट मध्ये फेल झाला अथवा तो १०० टक्के फिट नसेल, तर मग पुढे काय? अशा परिस्थितीत राहुलच्या जागी श्रेयस अय्यरला यूएईला पाठवण्यात येईल. म्हणून श्रेयस अय्यरला स्टँडबायवर ठेवण्यात आलं आहे.
असा आहे आशिया कपसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उप-कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.