Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Loyola Football Cup: आर्हतवा डोंगरेचा ‘पंच’! पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन बचाव, बिशप्स कॅम्प उपांत्य फेरीत

Football: दरम्यान, विद्या व्हॅली स्कूलने यू-१२ उपांत्यपूर्व फेरीत इन्फंट जीझस स्कूलचा ५-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. एकांश ओझाने २२व्या आणि २५व्या मिनिटाला दोन गोल केले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2026 | 04:12 PM
Pune Football Tournament

Pune Football Tournament

Follow Us
Follow Us:
  • बिशप्स कॅम्प, विद्या व्हॅली लोयला फुटबॉल कपच्या उपांत्य फेरीत
  • आर्हतवा डोंगरेच्या शानदार बचावामुळे बिशप्स कॅम्पचा शूटआऊटमध्ये सेंट व्हिन्सेंट्सवर विजय
  • विद्या व्हॅलीची यू-१२ आणि यू-१४ मध्ये दिमाखदार आगेकूच
पुणे: गोलरक्षक आर्हतवा डोंगरेने (Sports) पेनल्टी शूटआऊटमध्ये तीन महत्त्वपूर्ण बचाव करताना चमकदार कामगिरी बजावल्याने द बिशप्स स्कूल, कॅम्पने सेंट व्हिन्सेंट्स हायस्कूलचा ३-१ असा शूटआऊटमध्ये पराभव केला. निर्धारित वेळेत सामना २-२ असा बरोबरीत राहिल्यानंतर बिशप्स कॅम्पने लोयला फुटबॉल कपच्या यू-१२ उपांत्यपूर्व फेरीत बाजी मारत उपांत्य फेरी गाठली. हा सामना मंगळवारी पाषाण येथील लोयला हायस्कूल मैदानावर झाला.

लोयला स्कूल आणि एक्स-लोयला अल्युमनी नेटवर्क यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेला टाटा ऑटोकॉमचे प्रायोजकत्व लाभले आहे. बिशप्स कॅम्पने सामन्याची आक्रमक सुरुवात केली. चौथ्या मिनिटाला व्हिरेन बिलिमोरियाच्या स्वयंगोलमुळे बिशप्स कॅम्पने आघाडी घेतली. त्यानंतर कियान सूर्यवंशीने १५व्या मिनिटाला गोल करत संघाची आघाडी २-० अशी केली.

मात्र, सेंट व्हिन्सेंट्सने जोरदार पुनरागमन केले. रियांश मुंडाडाने २४व्या मिनिटाला गोल करत पिछाडी कमी केली, तर व्हिरेन बिलिमोरियाने ३९व्या मिनिटाला गोल करून सामना २-२ असा बरोबरीत आणला. सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआऊटचा आधार घ्यावा लागला. बिशप्स कॅम्पने ३-१ असा विजय मिळवताना कियान सूर्यवंशी, रणवीर झेंडे आणि प्रणय मेनन यांनी पेनल्टीचे गोल केले. गोलरक्षक आर्हतवा डोंगरेने तीन पेनल्टी अडवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Lionel Messi: पाणावलेले डोळे, पेनल्टी गोल अन्…लिओनेल मेस्सीचा शेवटचा सामना प्रचंड भावूक; एका युगाचा अंत

यू-१२च्या आणखी एका उपांत्यपूर्व सामन्यात बिशप्स को-एड स्कूल, उंड्रीने विद्या भवन हायस्कूलला निर्धारित वेळेत गोलशून्य बरोबरीत रोखल्यानंतर शूटआऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवला. बिशप्स को-एडसाठी अर्णव जाधव, हर्ष कुंभार, जयांश रेड्डी आणि मितांश शिंदे यांनी पेनल्टीचे गोल केले. विद्या भवनकडून मोझेस गावरे आणि श्लोक कदम यांनी गोल केले.

दरम्यान, विद्या व्हॅली स्कूलने यू-१२ उपांत्यपूर्व फेरीत इन्फंट जीझस स्कूलचा ५-० असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. एकांश ओझाने २२व्या आणि २५व्या मिनिटाला दोन गोल केले. त्यानंतर आदित्य द्विवेदी (३५वे), चिराग बिरजे (३७वे) आणि रियांश प्रशर (३९वे) यांनी गोल करत विद्या व्हॅलीचा मोठा विजय निश्चित केला.

विद्या व्हॅलीने यू-१४मध्येही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. उपांत्यपूर्व सामन्यात त्यांनी इन्फंट जीझस स्कूलचा ६-० असा एकतर्फी पराभव केला. अंश परिहारने ७व्या आणि २५व्या मिनिटाला दोन गोल केले, तर अर्जुन भाटिया (१८वे), आरव यादवाड (२६वे), आदिराज फाळके (२८वे) आणि युवान लोहिया (३५वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला.

India vs Brazil: पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर भारताची कोंडी! ब्राझीलने टीम इंडियाचा 4-0 ने केला गेम ओव्हर

उपांत्यपूर्व फेरी

यू-१२ : द बिशप्स स्कूल, कॅम्प २ [३] (व्हिरेन बिलिमोरिया ४’ स्वयंगोल, कियान सूर्यवंशी १५’; कियान सूर्यवंशी, रणवीर झेंडे, प्रणय मेनन) वि सेंट व्हिन्सेंट्स एचएस २ [१] (रियांश मुंडाडा २४’, व्हिरेन बिलिमोरिया ३९’; व्हिरेन बिलिमोरिया). यू-१२ : बिशप्स को-एड स्कूल, उंड्री ० [४] (अर्णव जाधव, हर्ष कुंभार, जयांश रेड्डी, मितांश शिंदे वि विद्या भवन एचएस ० [२] (मोझेस गावरे, श्लोक कदम). यू-१२ : विद्या व्हॅली स्कूल ५ (एकांश ओझा २२’, २५’; आदित्य द्विवेदी ३५’; चिराग बिरजे ३७’; रियांश प्रशर ३९’) वि. इन्फंट जीझस स्कूल ०. यू-१४ : विद्या व्हॅली ६ (अंश परिहार ७’, २५’; अर्जुन भाटिया १८’; आरव यादवाड २६’; आदिराज फाळके २८’; युवान लोहिया ३५’) वि. इन्फंट जीझस ०.

Web Title: Loyola football cup tournament arhatva dongre make goal 2 teams enter in semi finals at pune tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Football
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

Marathon: अजितदादांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना! बारामती पॉवर मॅरेथॉनमध्ये यंदा ७,२७० धावपटू धावणार
1

Marathon: अजितदादांच्या स्मृतींना अनोखी मानवंदना! बारामती पॉवर मॅरेथॉनमध्ये यंदा ७,२७० धावपटू धावणार

India Palestine Controversy: किती ते मागासलेपण? वर्णद्वेषी हातवारे करत भारताच्या कॅप्टनचा अपमान; AIFF आक्रमक
2

India Palestine Controversy: किती ते मागासलेपण? वर्णद्वेषी हातवारे करत भारताच्या कॅप्टनचा अपमान; AIFF आक्रमक

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: मेळघाटच्या जंगलातील तब्बल २४० हेक्टर वनक्षेत्र तोडले जाणार

IND vs PAK: पाकिस्तानची जिरवली! तब्बल १० व्या वेळी सॅफ चॅम्पियनशिपचा भारत मानकरी, 2-1 ने दिली मात
4

IND vs PAK: पाकिस्तानची जिरवली! तब्बल १० व्या वेळी सॅफ चॅम्पियनशिपचा भारत मानकरी, 2-1 ने दिली मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.