लोयोला फुटबॉल कप (फोटो- istockphoto)
यंदाच्या स्पर्धेत यजमान लोयोला हायस्कूलसह सेंट व्हिन्सेंट हायस्कूल, द बिशप्स स्कूल, विद्या व्हॅली स्कूल, सेंट झेव्हियर्स, विद्या भवन हायस्कूल, जे. एन. पेटिट टेक्निकल हायस्कूल, ह्यूम मॅकहेन्री स्कूल, हचिंग्स हायस्कूल, कल्याणी स्कूल, इन्फंट जीझस हायस्कूल, सेंट पॅट्रिक्स हायस्कूल, बी. के. बिर्ला सेंटर ऑफ एज्युकेशन आणि ब्ल्यू रिज पब्लिक स्कूल यांसारख्या पुण्यातील अव्वल शाळांचे संघ मैदानात उतरणार आहेत.
स्पर्धेची गटवारी व स्वरूप
मैदानावरील दमदार कामगिरी आणि त्यानंतर जागतिक फुटबॉलमधील दिग्गजाकडून मिळालेली कौतुकाची थाप अशा दुहेरी आनंदाचे क्षण ‘प्रोजेक्ट महादेवा’च्या युवा फुटबॉलपटूंनी अनुभवले. आगामी आय-लीग तसेच इतर स्पर्धात्मक सामन्यांच्या तयारीच्या दृष्टीने खेळविण्यात आलेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये प्रोजेक्ट महादेवाच्या मुला-मुलींनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.
मुंबईतील कूपरेज फुटबॉल मैदानावर झालेल्या सामन्यात प्रोजेक्ट महादेवाच्या मुलांच्या संघाने मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन स्तरावरील विजेत्या डॉन बॉस्को, माटुंगा यांच्या १४ वर्षांखालील संघावर ५–० असा दणदणीत विजय मिळवला. तर मुलींच्या संघाने महाराष्ट्र राज्यस्तरीय १५ वर्षांखालील WIFA विजेत्या संघाविरुद्ध १–१ अशी बरोबरी साधत उत्कृष्ट लढत दिली.






