Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs GT Live Score: बटलरचा तडाखा आणि गीलची फटकेबाजी! लखनौचा घरच्या मैदानात ‘खेळ खल्लास’; गुजरात टायटन्सचा शानदार विजय

शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकी खेळीमुळे गुजरातला IPL 2026 हंगामातील सलग दुसरा विजय मिळवून देण्यात यश आले. दरम्यान, बटलरने आपल्या T20 कारकिर्दीत 14,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 12, 2026 | 07:34 PM
LSG vs GT Live Score (Photo Credit- X)

LSG vs GT Live Score (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • बटलरचा तडाखा आणि गीलची फटकेबाजी!
  • लखनौचा घरच्या मैदानात दारुन पराभव
  • गुजरात टायटन्सचा शानदार विजय
IPL 2026 LSG vs GT: IPL 2026 मधील 19 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स (LSG vs GT) यांच्यात ‘भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियम’वर खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ७ गडी राखून पराभव केला आहे. शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या अर्धशतकी खेळीमुळे गुजरातला IPL 2026 हंगामातील सलग दुसरा विजय मिळवून देण्यात यश आले. दरम्यान, बटलरने आपल्या T20 कारकिर्दीत 14,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 60 धावांची खेळी करत बटलरने इतिहास रचला, तर गिलने 56 धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी सामन्यात, प्रसिद्ध कृष्णाने 4 बळी घेत LSG ची फलंदाजी फळी पूर्णपणे उध्वस्त केली होती.
Gill and Buttler bring up fifties as GT move towards the finish line. Follow live: https://t.co/tOpgJKvOsv pic.twitter.com/37tduM2qxX — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 12, 2026

14,000 धावांचा टप्पा गाठणारा जोस बटलर पाचवा खेळाडू

जोस बटलर हा आपल्या T20 कारकिर्दीत 14,000 धावांचा टप्पा ओलांडणारा जगातील केवळ पाचवा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, ॲलेक्स हेल्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनी ही कामगिरी केली होती. लखनौविरुद्ध 37 चेंडूंत 60 धावांची खेळी करताना त्याने हा विक्रम प्रस्थापित केला. आतापर्यंत 176 धावा जमा केल्यामुळे, बटलर IPL 2026 मध्ये ‘ऑरेंज कॅप’चा प्रबळ दावेदार म्हणूनही समोर आला आहे.

MI vs RCB Live Score: वानखेडेवर RO-KO आमनेसामने! मुंबई इंडियन्सने जिंकला टॉस, बंगळुरूविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय

शुभमन गिल आणि प्रसिद्ध कृष्णाही चमकले

प्रसिद्ध कृष्णाने गुजरात टायटन्सच्या विजयाचा पाया रचला. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना केवळ 28 धावा देऊन 4 बळी मिळवले. ‘पर्पल कॅप’ आता कृष्णाकडे आली असून, त्याने या हंगामात आतापर्यंत 10 बळी मिळवले आहेत. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळेच गुजरातला LSG ला 164 धावांच्या एकूण धावसंख्येवर रोखण्यात यश आले.

बटलरचा तडाखा आणि गीलची फटकेबाजी!

165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी गुजरात टायटन्ससाठी 45 धावांची सलामीची भागीदारी रचली. मागील हंगामातील ‘ऑरेंज कॅप’ विजेता असलेल्या सुदर्शनला 15 धावांवर असताना बाद व्हावे लागले. मात्र, गिल आणि जोस बटलर यांनी संयमी 84 धावांची भागीदारी रचली आणि गुजरातला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. गिलने 40 चेंडूंत 56 धावा केल्या, तर बटलरने आपल्या बॅटने 60 धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदरने उर्वरित काम पूर्ण करत 13 चेंडूंत 21 धावा केल्या, तर राहुल तेवतिया 10 धावांवर नाबाद राहिला. गुजरातने 8 चेंडू राखून सामना जिंकला. या महत्त्वपूर्ण विजयामुळे त्यांचा निव्वळ धावगती दर देखील सुधारला आहे.

MI vs RCB Pitch Report: मुंबईत आज धावांची लयलूट होणार? वानखेडेच्या खेळपट्टीचे ‘हे’ गुपित आले समोर; टॉस ठरणार गेमचेंजर

Web Title: Lucknow suffers a crushing defeat on home ground gujarat titans secure a magnificent victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 07:27 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL 2026
  • LSG vs GT

संबंधित बातम्या

RR Vs SRH Live: जोफ्रा आर्चरसमोर ‘एसआरएच’चे लोटांगण; गुजरातविरुद्ध ‘महायुद्ध’ लढण्यासाठी रॉयल्स सज्ज
1

RR Vs SRH Live: जोफ्रा आर्चरसमोर ‘एसआरएच’चे लोटांगण; गुजरातविरुद्ध ‘महायुद्ध’ लढण्यासाठी रॉयल्स सज्ज

RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज
2

RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…
3

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…

SRH vs RR Eliminator: वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 व्या वर्षी मोडला द ग्रेट ‘ख्रिस गेल’चा रेकॉर्ड, ठरला सर्वात तरूण खेळाडू
4

SRH vs RR Eliminator: वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 व्या वर्षी मोडला द ग्रेट ‘ख्रिस गेल’चा रेकॉर्ड, ठरला सर्वात तरूण खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.