Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!

गट ‘ड’मध्ये हॉकी मध्य प्रदेशने छत्तीसगड हॉकीचा ३-१ असा पराभव केला. सानिया सय्यद, तन्वी आणि मिताली शर्मा यांच्या गोलमुळे मध्य प्रदेशने विजय मिळविला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 18, 2026 | 04:16 PM
pune hockey competition

pune hockey competition

Follow Us
Follow Us:

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू आहे हॉकी इंडिया स्पर्धा 
झारखंडने हॉकी पंजाबचा ३-१ असा पराभव केला
मध्य प्रदेशनेही दमदार पुनरागमन करत मिळविला विजय 

पुणे: नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणाने आपापल्या गटात सलग दुसरा विजय नोंदवत पात्रतेच्या शर्यतीतील स्थान भक्कम केले. हॉकी मध्य प्रदेशनेही दमदार पुनरागमन करत विजय मिळविला, तर यजमान हॉकी महाराष्ट्राला उत्तर प्रदेश हॉकीकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला.

विभाग ‘अ’, गट ‘अ’मध्ये हॉकी झारखंडने हॉकी पंजाबचा ३-१ असा पराभव केला. रजणी केरकेट्टा, पुष्पा डांग आणि सलोमी नाग यांनी झारखंडसाठी गोल केले, तर पंजाबकडून हरप्रीत कौरने एकमेव गोल नोंदविला. या विजयासह झारखंडने दोन सामन्यांतून ६ गुण मिळविले.गट ‘ब’मध्ये हॉकी हरियाणाने हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाचा ३-० असा पराभव करत सलग दुसरा विजय साजरा केला. खुशी, अंजनी आणि दुर्गा यांनी गोल करत हरियाणाला दोन सामन्यांतून ६ गुणांसह गटात अव्वल स्थानावर कायम ठेवले.

रणधुमाळी Hokcey स्पर्धेची! पुण्यनगरीत रंगला थरार; झारखंड, हरियाणा यांची दमदार सुरुवात अन्…

गट ‘ड’मध्ये हॉकी मध्य प्रदेशने छत्तीसगड हॉकीचा ३-१ असा पराभव केला. सानिया सय्यद, तन्वी आणि मिताली शर्मा यांच्या गोलमुळे मध्य प्रदेशने विजय मिळविला. छत्तीसगडकडून रुखमणीने गोल केला.गट ‘क’मध्ये उत्तर प्रदेश हॉकीने यजमान हॉकी महाराष्ट्रावर ३-० असा दणदणीत विजय नोंदविला. श्वेता उपाध्याय, अन्नू आणि वंदना पटेल यांनी प्रत्येकी गोल केला.

उत्तर प्रदेशने दोन सामन्यांतून ४ गुणांसह अव्वल स्थान मिळविले असून महाराष्ट्राला अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही.दरम्यान, विभाग ‘ब’मधील रविवारीच्या सामन्यांत हॉकी मिझोरामने आंध्र प्रदेशवर ४-१, दिल्ली हॉकीने केरळवर ५-०, हॉकी कर्नाटकने गोअन्स हॉकीवर तब्बल ९-०, तर हॉकी बिहारने तामिळनाडूवर ५-१ विजय मिळविला. कर्नाटक आणि मिझोराम यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान निश्चित केले.

Hockey World Cup 2026: टीम इंडियाची विजयी गर्जना! वेल्सला नमवत वर्ल्ड कपमध्ये शानदार सुरुवात

गट ‘ब’मधील सामन्यात हॉकी हरियाणाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत हॉकी बंगालवर १०-१ असा मोठा विजय मिळवला. हा स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वाधिक गोलफरकाचा विजय ठरला. हरियाणाकडून कौर सुखप्रीत हिने २ऱ्या आणि २१व्या मिनिटाला दोन गोल केले. अंजनी हिने ६व्या, ४९व्या आणि ५७व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक नोंदवली. 

Web Title: Maharashtra defeated 0 3 by uttar pradesh in the hockey india junior womens national championship

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • Hockey
  • Pune
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
1

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले
2

Asian Games 2026 : ‘चक दे इंडिया’; अखेर पोरींनी करून दाखवलं, तब्बल 44 वर्षांनंतर भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकले

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन
3

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
4

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.