Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hockey Competition: हॉकीत चंदीगड अन् मध्य प्रदेशचा बोलबाला; महाराष्ट्राला मात्र पराभवाचा धक्का

गट ‘क’मध्ये हॉकी मणिपूरने यजमान महाराष्ट्राचा ३-२ असा पराभव केला. मणिपूरच्या सल्लू पुख्रंबमने २१, ४३ आणि ४७व्या मिनिटाला गोल नोंदवत हॅट्ट्रिक केली. महाराष्ट्राकडून रुबी राठोडने ४९व्या, तर तानिष्का शिंदेने ५३व्या मिनिटाला गोल केला.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 19, 2026 | 03:59 PM
Hockey Competition: हॉकीत चंदीगड अन् मध्य प्रदेशचा बोलबाला; महाराष्ट्राला मात्र पराभवाचा धक्का
Follow Us
Follow Us:

यजमान महाराष्ट्राचा मणिपूरकडून २-३ पराभव
पिंपरीत कनिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी स्पर्धेला रंगत
चंदीगड, ओडिशा, मध्य प्रदेश, मणिपूर उपांत्यपूर्व फेरीत

पुणे: नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू असलेल्या १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत मंगळवारी हॉकी चंदीगड, हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा, हॉकी मध्य प्रदेश आणि हॉकी मणिपूर यांनी दमदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. दिवसाच्या अखेरच्या सामन्यात यजमान हॉकी (Sports) महाराष्ट्राला मणिपूरकडून २-३ असा पराभव पत्करावा लागला. हॉकी इंडियाच्या मार्गदर्शनाखाली हॉकी महाराष्ट्रातर्फे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मणिपूरकडून महाराष्ट्राचा पराभव
गट ‘क’मध्ये हॉकी मणिपूरने यजमान महाराष्ट्राचा ३-२ असा पराभव केला. मणिपूरच्या सल्लू पुख्रंबमने २१, ४३ आणि ४७व्या मिनिटाला गोल नोंदवत हॅट्ट्रिक केली. महाराष्ट्राकडून रुबी राठोडने ४९व्या, तर तानिष्का शिंदेने ५३व्या मिनिटाला गोल केला. मात्र, मणिपूरने आघाडी कायम ठेवत सामना जिंकला. या गटात उत्तर प्रदेश हॉकीने दोन सामन्यांत चार गुणांसह गोलफरकाच्या आधारे पहिले स्थान मिळवले. मणिपूरनेही चार गुणांसह दुसरे स्थान मिळविले. महाराष्ट्राला दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला.

चंदीगडचा पंजाबवर विजय
गट ‘अ’मध्ये हॉकी चंदीगडने हॉकी पंजाबचा ३-१ असा पराभव करत स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला. दीक्षा (३३वे मिनिट), रवीना (३४वे) आणि प्रिया चौहान (४६वे) यांनी चंदीगडसाठी गोल केले. पंजाबकडून जैसमीन कौरने ४०व्या मिनिटाला एकमेव गोल केला. हॉकी झारखंडने सहा गुणांसह गटात पहिले, तर चंदीगडने तीन गुणांसह दुसरे स्थान मिळविले.

Hockey National Championship: यजमान महाराष्ट्राला धक्का, पण झारखंड-हरियाणाचा दणदणाट!

ओडिशाचा बंगालवर ६-० विजय
गट ‘ब’मध्ये हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाने हॉकी बंगालचा ६-० असा धुव्वा उडविला. द्रुपती नाईकने १०व्या आणि ४७व्या मिनिटाला दोन गोल केले. अजिता एक्का (२९वे), एक्का सोनाली (३०वे), बिनाती मिंझ (४४वे) आणि भोली डोली (४९वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयासह ओडिशाने तीन गुणांसह दुसरे स्थान मिळविले. हॉकी हरियाणा सहा गुणांसह अव्वल राहिले.

मध्य प्रदेशची हिमाचलवर मात
गट ‘ड’मध्ये हॉकी मध्य प्रदेशने हॉकी हिमाचलचा ६-० असा एकतर्फी पराभव केला. तन्वीने १२व्या मिनिटाला खाते उघडले. काजलने १९, २६ आणि ५२व्या मिनिटाला तीन गोल केले. मिताली शर्मा (५८वे) आणि कुदरत (५९वे) यांनी प्रत्येकी एक गोल केला. मध्य प्रदेशने सहा गुणांसह गटात अव्वल स्थान मिळविले.

रणधुमाळी Hokcey स्पर्धेची! पुण्यनगरीत रंगला थरार; झारखंड, हरियाणा यांची दमदार सुरुवात अन्…

उपांत्यपूर्व फेरीतील लढती
हॉकी झारखंड विरुद्ध हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा
हॉकी मध्य प्रदेश विरुद्ध हॉकी मणिपूर
हॉकी हरियाणा विरुद्ध हॉकी चंदीगड
उत्तर प्रदेश हॉकी विरुद्ध छत्तीसगड हॉकी
स्पर्धेची विजेती टीम ठरविण्यासाठी आता या उपांत्यपूर्व लढतींकडे लक्ष लागले आहे.

स्पर्धेचे प्रायोजकत्व : भारतीय स्टेट बँक प्रस्तुत प्रायोजक, युनियन बँक ऑफ इंडिया पॉवरिंग पार्टनर, एमक्युअर फार्मास्युटिकल्स अधिकृत भागीदार, बिसलेरी हायड्रेशन पार्टनर, तर अस्वानी असोसिएट्स आणि सुहाना मसाला सपोर्ट पार्टनर्स आहेत.

Web Title: Maharashtra defeated by manipur in the hockey india junior womens national championship pune sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 03:59 PM

Topics:  

  • Hockey
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
1

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
2

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता
3

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
4

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.