Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

38th National Sports 2025: कोल्हापूरच्या लेकीनं गाजवलं मैदान; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केली ‘Gold Medal’ ची कमाई

डोंगरदर्‍यातील रुद्रपूरमधील सायकलिंगच्या टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात तिने तीस किलोमीटरचे अंतर 45 मिनिटे व 30.374 सेकंदात पार करीत सोनेरी यशाला गवसणी घातली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 30, 2025 | 07:56 PM
38th National Sports 2025: कोल्हापूरच्या लेकीनं गाजवलं मैदान; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केली 'Gold Medal' ची कमाई

38th National Sports 2025: कोल्हापूरच्या लेकीनं गाजवलं मैदान; राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केली 'Gold Medal' ची कमाई

Follow Us
Follow Us:

रुद्रपूर: उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या पूजा दानोळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या लौकिकला साजेशी कामगिरी केली. घरची पार्श्वभूमी पैलवानांची असली तरीही महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने सायकलिंग मध्ये करिअर करताना 30 किलोमीटर टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध करून दिवस गाजविला.

डोंगरदर्‍यातील रुद्रपूरमधील सायकलिंगच्या टाईम ट्रायल या क्रीडा प्रकारात तिने तीस किलोमीटरचे अंतर 45 मिनिटे व 30.374 सेकंदात पार करीत सोनेरी यशाला गवसणी घातली. टाईम ट्रायल म्हणजे पूजा असेच समीकरण सायकलिंग मध्ये मानले जाते. कोल्हापूर जिल्ह्यातील इंगळी या गावातील खेळाडू पूजा हिने आजपर्यंत मुलींच्या 14, 16 व 18 वर्षाखालील गटात तसेच वरिष्ठ महिलांच्या गटात याच क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर सातत्याने सुवर्ण पदकांचीच कमाई केली आहे.

आजही तिने सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत वेळ व वेग या दृष्टीने योग्य नियोजन केले होते त्यामुळेच तिला येथे पुन्हा विजेतेपदाचा मान मिळाला. पुन्हा एकदा सुवर्णपदक मिळाल्यामुळे मला खूपच आनंद झाला असून ही कामगिरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्यासाठी ऊर्जा देणारी असल्याचे पूजाने पदकवितरणानंतर सांगितले. पूजा हिचे वडील बबन व भाऊ हर्षद हे दोघेही नामवंत कुस्तीगीर आहेत.

हेही वाचा: National Sports Competition: मराठमोळे नेमबाज सज्ज; दहा मीटर एअर रायफलमध्ये पदकाची आशा

2016 मध्ये तिने ज्येष्ठ प्रशिक्षक दिपाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायकलिंगचा प्राथमिक ज्ञान आत्मसात केले त्यानंतर तिने मिळवलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये यश पाहून भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या नवी दिल्ली येथील प्रशिक्षण केंद्रात तिची निवड झाली. तिला तेथे अनिल कुमार यांचे मार्गदर्शन मिळत आहे. मात्र तिला फारशी कुस्तीची आवड नव्हती सुरुवातीला तिने ट्रायथलॉन मध्ये करिअर करण्याचे ठरविले होते मात्र घरच्यांच्या आग्रहाखातर आणि सहकार्याने तिने सायकलिंग मध्ये करिअर सुरू केले.

आजपर्यंत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहेत. ती इचलकरंजी येथील न्यू इंग्लिश स्कूल खंजिरे शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शेवटच्या वर्षाला आहे. उत्तराखंडातील 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महाराष्ट्राचे हे तिसरे सुवर्णपदक आहे. स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी ट्रायथलॉनमध्ये 2 सुवर्णपदके जिंकून महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली होती. 3 सुवर्णपदकांसह महाराष्ट्र मणिपूर, हरियाणा पाठोपाठ तिसर्‍या स्थानावर आहे.

कोल्हापूरच्या नेमबाजांवर मदार

ऑलिम्पिक कांस्यपदकविजेता स्वप्नील कुसाळे व अर्जून पुरस्कारार्थी अनुभवी नेमबाज राही सरनोबत या कोल्हापूरच्या स्टार नेमबाजांच्या उपस्थितीमुळे महाराष्ट्राच्या पदकांची अपेक्षा वाढली आहे. शिवाय मुंबईची हिना सिद्धू व राष्ट्रीय पदकविजेती छत्रपती संभाजीनगरची रिया थत्ते हे नेमबाजही पदकाच्या शर्यतीत असतील. महाराष्ट्राचे नेमबाज यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत किमान १५ पदके जिंकतील, असा विश्वास संघाच्या व्यवस्थापिका श्रद्धा नालमवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: 38th National Sports 2025 : महाराष्ट्राने मारला पदकांचा चौकार, मिहीर आम्बेची रूपेरी कामगिरी, आदिती, ओमला कांस्य

महिला गटात सलग दुसर्‍यांदा सोनेरी यश
ट्रायथलॉनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला सलग दुसर्‍या वर्षी सुवर्णपदक मिळाले. डॉली पाटील हिने एकूण १ तास १० मिनिटे व ०३ सेंकद वेळेसह हे सोनेरी यश संपादन केले. दोघीही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू होय. तिचीच राज्य सहकारी मानसी मोहिते हिने रौप्यपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या आद्या सिंहला कांस्यपदक मिळाले.  ट्रायथलॉनच्या मिश्र रिले शर्यतीतही महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरूषांच्या ट्रायथलॉनमध्ये पार्थ निरगे याने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या झोळीत पहिले पदक टाकले.

Web Title: Maharashtra kolhapur daughter pooja danole won gold medal at 30 km cycling time trial at national sports competition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 07:53 PM

Topics:  

  • kolhapur
  • Sports News
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली
1

Maharashtra Live breaking News in Marathi: MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तूर्तास पुढे ढकलली

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन
2

साताऱ्यात शालेय कुस्तीचा थरार सुरू; ३५० मल्लांचा आखाडा रंगणार, शिवेंद्रसिंहराजेंकडून मल्लांना प्रोत्साहन

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात
3

Kolhapur : कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर नवरात्रासाठी सज्ज; स्वच्छता मोहिमेला सुरुवात

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
4

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.