Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

Maharashtra Live breaking : २ ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. महात्मा गांधी जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता मोहिमा, डिजिटल शुल्काविरोधात व्यापाऱ्यांचे 'नो यूपीआय डे' आंदोलन, आशियाई खेळातील भारतीय खेळाडूंची पदक घोडदौड आणि राज्यातील मान्सून परतीचा अंदाज; वाचा आजचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 02, 2026 | 10:30 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 02.10.2026

Maharashtra Breaking News Today 02.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 02 Oct 2026 10:30 AM (IST)

    02 Oct 2026 10:30 AM (IST)

    रिलीजआधीच ‘दृश्यम 3’चा बॉक्स ऑफिसवर धमाका! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये मोठी झेप;

    अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित ‘दृश्यम 3’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर ही प्रतीक्षा संपली असून, आज २ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगला मिळालेल्या प्रतिसादामुळे पहिल्या दिवसाच्या कमाईबाबतच्या अपेक्षा वाढल्या आहेत. गांधी जयंतीच्या सुट्टीचाही चित्रपटाला फायदा होण्याची शक्यता आहे.

  • 02 Oct 2026 10:20 AM (IST)

    02 Oct 2026 10:20 AM (IST)

    बजेट सेगमेंटमध्ये गेमचेंजर एंट्री! Samsung Galaxy A08 ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या फीचर्स

    टेक कंपनी सॅमसंगने भारतात नवा Samsung Galaxy A08 लाँच केला आहे. 20 हजार रुपयांहून कमी किंमतीत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यांचे बजेट कमी आहे, त्यांच्यासाठी हा स्मार्टफोन एक चांगला पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • 02 Oct 2026 10:10 AM (IST)

    02 Oct 2026 10:10 AM (IST)

    सहलीसाठी दिवेआगरला गेले अन् समुद्राने घात केला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

    आळंदी येथील विनर्स अकॅडमीच्या सहलीसाठी रायगडमधील दिवेआगर येथे गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. मृत विद्यार्थ्यांचे मृतदेह बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातून श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. रात्री उशिरा पुण्याहून नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह पुण्याकडे रवाना करण्यात आले.

  • 02 Oct 2026 10:00 AM (IST)

    02 Oct 2026 10:00 AM (IST)

    CJP Shivaji Park Protest Row: अभिजीत दिपकेंचा 'जेल भरो'चा इशारा, वसई वकील संघटनेचा पाठिंबा

    CJP Shivaji Park Protest Row:   मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. उच्च न्यायालयाच्या २०१३ च्या आदेशानुसार हा परिसर सायलेंस झोन असल्याचे तसेच सुरक्षेसह वाहतूक कोंडी व ध्वनिप्रदूषणाचा धोका असल्याचे कारण पोलिसांनी दिले आहे. मात्र, CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पोलिसांचा हा निर्णय फेटाळून लावत नियोजित वेळेतच आंदोलन करण्याचा आणि प्रसंगी 'जेल भरो' आंदोलनाचा इशारा दिला आहे.

    या वादाच्या पार्श्वभूमीवर वसईतील वकील संघटनेने (Vasai Lawyers Association) आंदोलकांना कायदेशीर पाठिंबा जाहीर करत, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यास न्यायालयात विनामूल्य वकीलपत्र घेण्याची घोषणा केल्याने मुंबई आणि वसई परिसरातील राजकीय व सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.

  • 02 Oct 2026 09:50 AM (IST)

    02 Oct 2026 09:50 AM (IST)

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार

    तिरुवनंतपुरम : केरळच्या गृह विभागाने केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याशी संबंधित सुमारे दोन दशक जुन्या दक्षता तपासाच्या नोंदी मागवल्या आहेत. कुमार केरळच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असताना २००६ मध्ये ही चौकशी सुरू झाली. हे प्रकरण केरळ राज्य परिवहन प्रकल्पांतर्गत एमसी रोडच्या बांधकामाशी संबंधित आहे. या प्रकल्पाशी संबंधित इंडो-मलेशियन कंपनी पाटी-बेलचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक ली सी. बीन यांनी २००६ मध्ये क्वालालंपूरमध्ये आत्महत्या केली होती.

     

  • 02 Oct 2026 09:40 AM (IST)

    02 Oct 2026 09:40 AM (IST)

    MPSC Drug Inspector Paper Leak Controversy: पुण्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; रोहित पवार रात्रभर आंदोलनात सहभागी

    MPSC Drug Inspector Paper Leak Controversy: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक (Drug Inspector) परीक्षेचा पेपर फुटल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्यभरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो परीक्षार्थींमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या गंभीर गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी सायंकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. आंदोलक विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्वतः रात्रभर रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांसोबत या आंदोलनात सहभाग घेतल्याने हे प्रकरण चांगलेच तापले आहे.

  • 02 Oct 2026 09:30 AM (IST)

    02 Oct 2026 09:30 AM (IST)

    जंतरमंतरवर कलम १६३ लागू, घोषणाबाजी, पोस्टरबाजी करण्यास मनाई

    janatar Mantar Protest:  गांधी जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर) आज दिल्लीत आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन विद्यार्थी संघटना, डावे पक्ष, युवक काँग्रेस आणि आम आदमी पार्टी (आप) यांनी पुकारले आहे.  पण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम १६३ लागू करण्यात आले आहे. याचा अर्थ, जंतर मंतर आणि कनॉट प्लेस परिसरात गर्दी करण्यास परवानगी दिली जाणार नाही. वाहतुकीवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. याशिवाय, दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमेवर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

    खरं तर, जंतर मंतर येथील आंदोलनाची घोषणा झाल्यापासून दिल्ली पोलिसांनी शांतता राखण्यासाठी आधीच व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. नवी दिल्लीतील व्हीव्हीआयपी भागांमध्ये अतिरिक्त दल तैनात करण्यात आले आहे. पोलिसांसोबतच निमलष्करी दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीभर हजारो जवान तैनात आहेत.

  • 02 Oct 2026 09:23 AM (IST)

    02 Oct 2026 09:23 AM (IST)

    Jantar Mantar Student Protest: शिवाजी पार्क पाठोपाठ जंतरमंतरवरही आंदोलन

    शिवाजी पार्क पाठोपाठ जंतरमंतरवरही विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात ऑल इंडिया स्टूडेंट्स एसोसिएशनची राष्ट्रीय अध्यक्षा नेहा वोरा यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला परवानगी देण्यात आली नसली तरी हे आंदोलन होणारच असा निर्धार नेहा वोरा यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra to World Breaking News : 

केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त  ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि एसआयआर प्रक्रियेतील फेरफारविरोधात आज (2 ऑक्टोबर) कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू होणार आहे.मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आज सायंकाळी ४ वाजल्यापासून सीजेपीचे आंदोलन सुरू होत आहे.

ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा,  विशेष तीव्र फेरफार (SIR – Special Intensive Revision) अंतर्गत मतदार याद्यांमधून वगळण्यात आलेली नावे आणि ही प्रक्रिया थांबवावी. भविष्यातील निवडणूक आयुक्त नियुक्तीमध्ये नागरी समाजाच्या (civil society) सदस्यांचा सहभाग अनिवार्य करावा, अशी मागणी सीजेपीकडून करण्यात आली आहे.  

महात्मा गांधी यांच्या १५७ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी दिल्लीतील राजघाटावर जाऊन आदरांजली वाहिली असून देशभर ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान आणि विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग आला असला तरी बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 2 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 09:09 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news
  • Sports News

संबंधित बातम्या

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
1

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड
2

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार? केरळच्या गृहविभागाने मागवले जुने रेकॉर्ड

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते
3

तुफानी फलंदाजी, भेदक गोलंदाजी अन् थरारक विजय; स्टॅलियंस ठरले DSP Cricket League चे विजेते

Chess च्या विश्वात भारताचा तिरंगा उंचावला! सलग तिसऱ्यांदा पटकावला मानाचा करंडक, उझबेकिस्तानमध्ये…
4

Chess च्या विश्वात भारताचा तिरंगा उंचावला! सलग तिसऱ्यांदा पटकावला मानाचा करंडक, उझबेकिस्तानमध्ये…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.