
photo- social media
नरेंद्र हिरवाणी यांनी १९८८ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध चेन्नई कसोटीत ६१ धावा देत ८ विकेट्स घेतले होते. मानव सुतारच्या ३३ धावांत ६ विकेट्समुळे तो आता या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने सय्यद आबिद अली (६/५५), रविचंद्रन अश्विन (६/४७) आणि दिलीप दोशी (६/१०३) यांसारख्या महान खेळाडूंचे विक्रम मागे टाकले आहेत.
२३ वर्षीय डावखुरा फिरकीपटू मानव सुथार हा पदार्पणात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा भारताचा दहावा गोलंदाज ठरला आहे. तसेच ३८ वर्षांनंतर कसोटी पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत त्याने स्थान मिळवले. त्याची ६/३३ ही कामगिरी भारतीय क्रिकेटमध्ये विशेष मानली जात आहे. मानवने अब्दुल मलिक, रहमानुल्ला गुरबाज, अफसर झाझाई, शराफुद्दीन अश्रफ, मोहम्मद सलीम सैफी आणि रहमत शाह यांना बाद केले.
मानव सुथारने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्याच ओव्हरमधील चौथ्याच चेंडूवर विकेट घेत धमाकेदार सुरुवात केली. त्याने अफगाणिस्तानच्या फलंदाज अब्दुल मलिकला बाद करत शानदार सुरुवात केली. गेल्या २५ वर्षांत पदार्पणाच्या पहिल्या षटकात विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी मोंटू बॅनर्जी, मनोहर हार्डिकर, वामन कुमार, चेतन शर्मा, डब्ल्यू. व्ही. रमण, निलेश कुलकर्णी आणि टिनू योहानन यांनी ही कामगिरी केली आहे.