Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मॅथ्यू ब्रीट्झकेने रचला इतिहास! पहिल्या चार ODI मध्ये केला ‘हा’ पराक्रम ; ‘या’ भारतीय दिग्गजाशी साधली बरोबरी 

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने सुरवातीच्या एकदिवसीय सामन्यात सलग चार अर्धशतकं  लगावून पराक्रम केला आहे. या कामगिरीसह त्याने भारतीय नवज्योत सिंग सिद्धूच्या विक्रमाशी बरोबरी केली.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Aug 22, 2025 | 05:43 PM
Matthew Britzke creates history! He did 'this' feat in the first four ODIs; equalled 'this' Indian legend

Matthew Britzke creates history! He did 'this' feat in the first four ODIs; equalled 'this' Indian legend

Follow Us
Close
Follow Us:

Matthew Britzke creates history in ODI cricket : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज मॅथ्यू ब्रीट्झकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ धावांची खेळी करून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग चौथे अर्धशतक झळकावून इतिहास रचला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात मॅथ्यू ब्रीट्झक हा त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या ४ डावात सलग चार वेळा ५०+ धावा करणारा पहिला फलंदाज बनला आहे.

हेही वाचा : BCCI मध्ये निघाल्या नवीन जागा! ‘या’ नोकरीसाठी मिळणार वार्षिक तब्बल ९० लाख रुपये

मॅथ्यू ब्रीट्झकेने गुरुवारी मॅके येथे खेळवण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा भीम पराक्रम केला आहे. त्याने ८८ धावांची खेळी खेळून इतिहास रचला. या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. तथापि, तो ३१ व्या षटकात माघारी परतला. ब्रीट्झकेने त्याच्या पहिल्या कारकीर्दीतील चार एकदिवसीय सामन्यात चार वेळा ५० पेक्षा जास्त धावा करून नवज्योत सिंग सिद्धूच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

सिद्धूने केला होता ‘हा’ विक्रम

नवजोत सिंग सिद्धूने १९८७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले होते. नवजोत सिंग सिद्धूने त्याच्या चार एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग चार अर्धशतकं  झळकवले होते. यामध्ये नवजोत सिंग सिद्धूने ७३ (ऑस्ट्रेलियाविरुद्ध), ७५ (न्यूझीलंडविरुद्ध), ५१ (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) आणि ५५ (झिम्बाब्वेविरुद्ध) धावा केल्या होत्या.

ब्रिट्झकेची कारकिर्दीची दमदार सुरवात

ब्रिट्झकेने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीची दमदार  सुरुवात केली. त्याने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच शतक झळकावले ठोकले. त्यानंतर  पुढील तीन डावांमध्ये देखील ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली. या वर्षाच्या सुरुवातीला ब्रिट्झकेने लाहोरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याने १५० धावांची शानदार खेळी खेळली होती. जी एकदिवसीय सामन्यातील पदार्पणातील आतापर्यंतची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.

मॅथ्यू ब्रीट्झकेचे आतापर्यंतचे पहिले चार एकदिवसीय सामन्यातील कामगिरी

  1. १५० (१४८) विरुद्ध न्यूझीलंड, लाहोर
  2. ८३ (८४) विरुद्ध पाकिस्तान, कराची
  3. ५७ (५६) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, केर्न्स
  4. ८८ (७८) विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मॅके

नवजोत सिंग सिद्धूनेही चार अर्धशतकांसह आपल्या कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. पण हे पाच सामन्यांमध्ये घडले. खरं तर, सिद्धूला एका सामन्यात फलंदाजी करण्याची संधी मिळू शकली नव्हती.

दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्झकेने आता पहिल्या चार एकदिवसीय डावांनंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला आहे. त्याने ३७८ धावा करून टेम्बा बावुमाचा २८० धावांचा विक्रमाला  मागे टाकले.

पहिल्या चार डावांमध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारे फलंदाज

  1. ३७८ – मॅथ्यू ब्रीट्झके (दक्षिण आफ्रिका)
  2. २८० – टेम्बा बावुमा (दक्षिण आफ्रिका)
  3. २७९ – अॅलन लँब (इंग्लंड)

चौथा एकदिवसीय डाव खेळण्यापूर्वी, ब्रीट्झकेने एकदिवसीय इतिहासात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या डावानंतर सर्वाधिक एकदिवसीय धावांचा विक्रम आधीच केला होता.

हेही वाचा : दक्षिण आफ्रिकेतील ‘या’ 8 शहरांमध्ये रंगणार 44 सामन्यांचा थरार! World Cup 2027 बद्दल मोठी माहिती समोर..

Web Title: Matthew britzke fourth consecutive half century in first four odis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 05:43 PM

Topics:  

  • AUS vs SA

संबंधित बातम्या

AUS vs SA 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका! संघाचा कर्णधार मांडीच्या दुखापतीमुळे दुसरा सामना खेळणार नाही
1

AUS vs SA 2nd ODI : दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका! संघाचा कर्णधार मांडीच्या दुखापतीमुळे दुसरा सामना खेळणार नाही

SA VS AUS Match Preview : ऑस्ट्रेलियासमोर करो या मरो कि स्थिती! आज रंगणार दुसरा सामना
2

SA VS AUS Match Preview : ऑस्ट्रेलियासमोर करो या मरो कि स्थिती! आज रंगणार दुसरा सामना

AUS vs SA 2nd ODI Live Streaming: मालिका विजयासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज, ऑस्ट्रेलिया रोखणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना
3

AUS vs SA 2nd ODI Live Streaming: मालिका विजयासाठी दक्षिण आफ्रिका सज्ज, ऑस्ट्रेलिया रोखणार? जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
4

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.