साऊथ आफ्रिकेमधील क्रिकेट मैदान(फोटो-सोशल मीडिया)
The 2027 ODI World Cup will be played in South Africa : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२७ बाबत मोठी माहिती समोर आली आहे. विश्वचषकात २०२७ च्या स्पर्धेत एकूण ५४ सामने खेळवले जाणार आहेत. ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील आठ शहरांमध्ये ४४ सामन्यांचा थरार बघायला मिळणार आहे. त्याच वेळी, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये १० सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण विश्वचषक २०२७ हा आफ्रिकेव्यतिरिक्त, विश्वचषक झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये पार पडणार आहे. आफ्रिकन खंडातील हे तीन देश ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२७ मध्ये संयुक्तपणे या मेगा स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून गुरुवारी विश्वचषक स्पर्धेशी संबंधित असणारी महत्त्वाची माहिती उघड कळे आहे. यामध्ये सांगण्यात आले आहे की, जोहान्सबर्ग, प्रिटोरिया, केपटाऊन, डर्बन, ग्केबेर्हा (पूर्वी पोर्ट एलिझाबेथ), ब्लोमफोंटेन, पूर्व लंडन आणि पार्ल येथे एकदिवसीय विश्वचषक सामने खेळवण्यात येणार आहेत. या ८ शहरांमध्ये ४४ सामन्यांचा थरार अनुभवायला मिळणार आहे.
दरम्यान माजी अर्थमंत्री ट्रेवर मॅन्युएल यांची स्थानिक आयोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष पर्ल माफोशे यांनी प्रतिक्रिया देतान सांगितले की, “आमचे उद्दिष्ट असा कार्यक्रम आयोजित करणे असणार आहे जो केवळ जागतिक स्तरावर प्रेरणा देणारा नाही तर दक्षिण आफ्रिकेचे वैविध्यपूर्ण, समावेशक आणि एकात्म स्वरूप जगासमोर सादर करणारा असेल.”
२००९ मध्ये आयसीसी स्पर्धेचे दक्षिण आफ्रिकेत आयोजन करण्यात आले होते. तेव्हा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी तेथे खेळवण्यात आली होती. यापूर्वी, २००७ मध्ये टी२० विश्वचषक आणि २००३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांच्या यजमानपदाखाली खेळवला होता.
तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये महिला क्रिकेटमधील दोन प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये २००५ चा एकदिवसीय विश्वचषक आणि २०२३ चा महिला टी२० विश्वचषक खेळवण्यात आला होता. २०२३ च्या महिला टी२० विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. जिथे त्याला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारताकडून २०२३ मध्ये पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकाचे यशस्वी आयोजन करण्यात होते. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उद्घाटन आणि अंतिम सामने खेळवण्यात आले होते. तर उपांत्य सामने मुंबई आणि कोलकाता येथे खेळले गेले होते. याशिवाय धर्मशाळा, लखनौ, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, दिल्ली आणि पुणे या शहरांमध्ये या स्पर्धेतील सामने झाले होते.
हेही वाचा : भारताच्या ODI कर्णधारपदासाठी श्रेयस अय्यर का परफेक्ट आहे? ही आहेत 3 मुख्य कारणे