Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Messi विरुद्ध Mbappe महायुद्ध! गोल्स बरोबरीत सुटले तर…; गोल्डन बूटचा किंग कोण? काय आहे FIFA चा नियम?

Messi vs mbappe In Golden boot Race: स्पेनने दमदार कामगिरी करत फ्रान्सचा सेमिफायनल सामन्यात पराभव केला. यामुळे फ्रान्स आता तिसऱ्या स्थानासाठी भिडेल. परंतु गोल्डन बूटच्या शर्यतीत मेस्सी आणि आणि एम्बाप्पे हे दोघेही आघाडीवर आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 15, 2026 | 03:15 PM
Messi विरुद्ध Mbappe महायुद्ध!  गोल्स बरोबरीत सुटले तर…; गोल्डन बूटचा किंग कोण? काय आहे FIFA चा नियम?
Follow Us
Follow Us:
  • पहिल्या सेमिफायनल सामन्यात फ्रान्सचा पराभव
  • गोल्डन बूटच्या शर्यतीत Messi आणि Mbappe आघाडीवर
  • गोल्डन बूट विजेता कसा ठरवला जातो?
फिफा विश्वचषक २०२६ ( FIFA World Cup 2026) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेत केवळ दोनच सामने बाकी आहेत. पहिल्या सेमिफायनल सामन्यात स्पेनने फ्रान्सचा २-० ने पराभव केला. स्पेनने फ्रान्सचे सलग तिसऱ्या फिफा विश्वचषक अंतिम सामन्यात पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.परंतु, किलियन एम्बाप्पेची सर्वात मोठी वैयक्तिक लढाई अजून संपलेली नाही. फ्रान्स स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी, एम्बाप्पे गोल्डन बूटसाठी एक प्रबळ दावेदार आहे. तिसऱ्या स्थानासाठी फान्स पुन्हा एकदा भिडणार आहे. एम्बाप्पेला या सामन्यात इतिहास रचण्याची शेवटची संधी असेल. सध्या मेस्सी आणि एम्बाप्पे हे दोघेही गोल्डन बूटच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला

गोल्डन बूटच्या शर्यतीत Messi आणि Mbappe आघाडीवर

फिफा विश्वचषक २०२६ मधील गोल्डन बूटची शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. फ्रान्सचा किलियन एम्बाप्पे आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी प्रत्येकी ८ गोलांसह या शर्यतीत आघाडीवर आहेत. या दोघांनी आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन आणि ज्यूड बेलिंगहॅम हे देखील प्रत्येकी ६ गोलांसह या शर्यतीत टिकून आहेत. स्पर्धेच्या शेवटी जर दोन खेळाडूंचे गोल समान असतील, तर सर्वाधिक असिस्ट करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट दिला जातो. या बाबतीत सध्या एम्बाप्पे मेस्सीपेक्षा पुढे आहे. या हंगामात एम्बाप्पेने ३ असिस्ट केले आहेत, तर मेस्सीने २ केले आहेत. त्यामुळे, फ्रान्सचा कर्णधार एम्बाप्पेला सध्या गोल्डन बूट जिंकण्याची सर्वाधिक संधी आहे.

फिफा विश्वचषक २०२६ मधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

सध्या, किलियन एम्बाप्पे आणि लिओनेल मेस्सी यांच्यानंतर, इंग्लंडचे दोन स्टार खेळाडू, हॅरी केन आणि ज्यूड बेलिंगहॅम, फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत आघाडीवर आहेत. त्यांनी या हंगामात आतापर्यंत प्रत्येकी सहा गोल केले आहेत. या यादीत नॉर्वेचा अर्लिंग हालंड सात गोलांसह त्यांच्या पुढे आहे, परंतु त्याचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यामुळे त्याला गोल्डन बूट पुरस्कार जिंकता येणार नाही.

गोल्डन बूट विजेता कसा ठरवला जातो?

फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट मिळतो. पण जर दोन किंवा अधिक खेळाडूंनी समान गोल केले, तर विजेता निवडण्यासाठी काही नियम बनवण्यात आले आहेत. सर्वप्रथम, कोणत्या खेळाडूने सर्वाधिक असिस्ट्स (गोलसाठी मदत) करण्याचा विक्रम केला आहे, हे पाहिले जाते. जर असिस्ट्सच्या बाबतीत दोन्ही खेळाडू अगदी समान असतील, तर मैदानावर कमी वेळ कोणी घालवला आहे, हे पाहिले जाते. संपूर्ण स्पर्धेत कमी मिनिटे खेळून समान गोल करणाऱ्या खेळाडूला विजेता मानले जाते. या नियमानुसार, सध्या एमबाप्पे आघाडीवर आहे, कारण त्याने या फिफा विश्वचषकात मेस्सीपेक्षा कमी वेळ मैदानावर घालवला आहे.

FIFA World Cup 2030 ठरणार ऐतिहासिक! 64 संघांना संधी मिळणार? फिफा अध्यक्ष इन्फँटिनो यांचे संकेत

Web Title: Messi vs mbappe in golden boot race fifa world cup 2026 tie breaker winner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • Football Tournament
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक
1

‘अलविदा अर्जेंटिना’! फुटबॉल जगतात एका सुवर्णयुगाचा अंत; Lionel Messi ने घेतली निवृत्ती, चाहते भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.