
MI vs DC WPL live score: Delhi Capitals win the toss and elect to bowl! MI will bat first, aiming for their first win.
MI vs DC, WPL live score: महिला प्रीमियर लीग २०२६ चा तिसरा सामना आज शनिवारी नवी मुंबईत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाणार आहे. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
यापूर्वी पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने त्यांचा सामना गमावला आहे. त्यांनी शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शेवटच्या चेंडूवर मुंबईचा पराभव केला होता. हरमनप्रीत कौर आज दिल्लीविरुद्ध चांगली कामगिरी करून आपले विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. दरम्यान, जेमिमा रॉड्रिग्ज २०२६ च्या महिला प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदा दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे ती पहिल्यांदा नेतृत्व करून आपल्या संघाला विजय मिळवून ददेण्याच्या इराद्यानेच मैदानात उतरेल.
नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार जेमिमा रॉड्रिग्सने प्रतिक्रिया देत म्हटले की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत.” तसेच ती म्हणाली की, “डीवाय पाटील मैदान नेहमीच खास राहिले आहे, मी येथेच पदार्पण केले आणि आम्ही येथेच आमचा पहिला विश्वचषक देखील जिंकला, त्यामुळे हे खरोखरच खास आहे. मी १६ वर्षांची असल्यापासून माझ्या राज्याच्या संघाचे नेतृत्व करत आहे, माझा संघ कोणत्याही परिस्थितीत मला पाठिंबा देईल, आम्ही मैदानात उतरून मजा करू. या संघात खूप चांगली ऊर्जा आहे आणि त्यांना खेळताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. आमच्या संघात चार परदेशी खेळाडू असणार आहेत. तसेच आमच्या संघात लॉरा वोलवार्ड, लिझेल ली, चिनले हेन्री, मारिझान कॅप, शेफाली, स्नेह राणा आहेत आणि अनामिकाही पदार्पण करत आहे.”
नाणेफेक गमावाऱ्या मुंबई संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “जर आम्ही नाणेफेक जिंकली असती, तर आम्ही प्रथम फलंदाजी केली असती. सावरण्यासाठी खूप कमी वेळ होता, पण मागील सामन्यातून शिकणे आणि सुधारणा करणे नेहमीच महत्त्वाचे असते. आमच्या संघात एक बदल केले आहेत. सायका खेळत नाही, तर त्रिवेणी पदार्पण करणार आहे.” मुंबई इंडियन्स या हंगामात विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
हेही वाचा : UP vs GT, WPL Live Update : फोबी लिचफिल्डचा संघर्ष व्यर्थ! GT चा UP वर दणदणीत विजय; रेणुका सिंग चमकली
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (क), मारिझान कॅप, निकी प्रसाद, चिनेल हेन्री, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): अमेलिया केर, जी कमलिनी (डब्ल्यू), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (क), निकोला केरी, सजीवन सजना, अमनजोत कौर, पूनम खेमनार, त्रिवेणी वसिष्ठ, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता