गुजरात जायंट्सकडून यूपी वॉरियर्सचा पराभव(फोटो-सोशल मीडिया)
UP vs GT, WPL Live Update : महिला प्रीमियर लीग २०२६ हंगाम सुरू झाला आहे. या हंगामातील दूसरा सामना आज शनिवारी यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात जायंट्सने धावांचा पाठलाग करणाऱ्या यूपी वॉरियर्सचा १० धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावणाऱ्या गुजरात जायंट्सने प्रथम फलंदाजी करत कर्णधार ऍशलेह गार्डनरच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर ४ बाद २०७ धावांचा डोंगर उभा केला आहे. परंतु, यूपी वॉरियर्स संघाला निर्धारित षटकात ८ बाद १९७ धावाच करता आल्या. यूपी वॉरियर्सकडून फोबी लिचफिल्डची अर्धशतकीय झुंज व्यर्थ ठरली. गुजरात जायंट्सकडून रेणुका सिंगने २ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : कुंडलीतच क्रिकेट कारकिर्द लिहिलेली! भारतीय खेळाडू वैष्णवीच्या वडिलांनी केली होती भविष्यवाणी; वाचा सविस्तर
सामान्यापूर्वी यूपी वॉरियर्सची कर्णधार मेग लॅनिंगने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि गुजारत जायंट्स प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. गुजारत जायंट्सने २० षटकात ४ बाद २०७ धावा केल्या. यामध्ये कर्णधार ऍशलेह गार्डनरच्या शानदार अर्धशतकाचे मोठे योगदान आहे. गार्डनरने ६५ धावा केल्या होत्या. यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोनने २ विकेट्स घेतल्या. तथापी, २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या यूपी वॉरियर्सच्या डावाची सुरवात चांगली झाली नाही. सलामीवीर किरण नवगिरे १ धाव करून ऍशलेह गार्डनरची शिकार ठरली. त्यानंतर मात्र, सलामीवीर मेग लॅनिंग आणि वन डाउन आलेल्या फोबी लिचफिल्डने सारी सूत्रे आपल्या हातात घेतली. या दोघांनी शानदार ७० धावांची भागीदारी रचली. त्यानंतर नवगिरे ३० धावा करून बाद झाली.
त्यानंतर आलेलीहरलीन देओल भोपळा न फोडताच माघारी गेली. त्यानंतर यूपीच्या विकेसत जात राहिल्या. दरम्यान, लिचफिल्डने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली आणि अर्धशतक पूर्ण केले. तिने श्वेता सेहरावतसोबत यूपीचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी मैदानात होती तोपर्यंत वाटत होतं किम यूपी हा सामना सहज जिंकले. परंतु, सेहरावत २५ धावा करून बाद झाली आणि त्यानंतर लिचफिल्ड देखील माघारी परतली. तिने ४० चेंडूत ७८ धावा केल्या. यामध्ये तिने ८ चौकार आणि ५ षटकार ठोकले. तिला डिव्हाईने बाद केले. त्यानंतर, डिआन्ड्रा डॉटिन १२, सोफी एक्लेस्टोन ११ धावा करून बाद झाल्या, तर आशा शोभना नाबाद २७ धावा तर पांडे १ धाव करून नाबाद राहिल्या. परिणामी, गुजरात जायंट्सने १० धावांनी विजय मिळवला. गुजरात जायंट्सकडून रेणुका सिंह ठाकूर, सोफी डिव्हाईन आणि जॉर्जिया वेरहॅम यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तर ऍशलेह गार्डनर आणि राजेश्वरी गायकवाड यांनी परतएकी १ विकेट घेतली.
यूपी वॉरियर्स : डिआन्ड्रा डॉटिन, मेग लॅनिंग (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, किरण नवगिरे, श्वेता सेहरावत (विकेटकीपर), आशा शोभना, सोफी एक्लेस्टोन, शिखा पांडे, क्रांती गौड
गुजरात जायंट्स : सोफी डिव्हाईन, बेथ मुनी (यष्टीरक्षक),ऍशलेह गार्डनर (कर्णधार), अनुष्का शर्मा, कनिका आहुजा, भारती फुलमाळी,काशवी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड, जॉर्जिया वेरहॅम, रेणुका सिंह ठाकूर
बातमी अपडेट होत आहे…






