
MI vs GT, WPL Live Updates: Mumbai Indians win the toss and elect to bowl! Gujarat Giants will bat first.
Mumbai Indians vs Gujarat Giants : आज मंगळवारी महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स असा सामना रंगणार आहे. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार असून सामान्यापूर्वी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरात जायंट्स प्रथम फलंदाजी करणार आहे. मुबंई संघाचे दोन सामने झाले असून एक सामना जिंकला तर एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे . तर ॲशले गार्डनरच्या संघाने मात्र दोन्ही सामन्यात विजय मिळवून आपला दबदबा राखला आहे. त्यामुळे या सामन्यात हरमनप्रीत कौरचा संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरणार तर गुजरात जायंट्स हा सामना जिंकून गुणतालिकेत पहिला क्रमांक गाठण्याच्या तयारीत असणार आहे.
टॉस जिंकल्यानंतर मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली की, “आम्ही प्रथम गोलंदाजी करणार असून मला दवबिंदूंवर विश्वास आहे, आणि विशेषतः जेव्हा तुम्ही रात्रीचे सामने खेळता, तेव्हा लक्ष्याचा पाठलाग करणे हा नेहमीच एक चांगला पर्याय असतो. मला वाटते की आम्ही सर्वच बाबतीत चांगली कामगिरी करत आहोत. दुर्दैवाने, नॅट (सायव्हर-ब्रंट) आज ठीक नाही, त्यामुळे तिच्या जागी हेले परत आली आहे. ती अशी खेळाडू आहे, जी फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये नेहमीच चांगली कामगिरी करते, आणि आम्हाला आशा आहे की ती संघात येऊन संघाची जबाबदारी उचलेल.
गुजरात गुजरात जायंट्सची कर्णधार ॲशले गार्डनरने टॉस गमावल्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “सध्या एकही (टॉस) जिंकू शकत नाहीये, पण हरकत नाही. मला वाटते की पॉवरप्ले खूपच महत्त्वाचा ठरला आहे. साहजिकच, सोफी आणि मूनी एकत्र फलंदाजी करत असल्याने आमच्याकडे फलंदाजीच्या आघाडीला खूप अनुभव आहे. त्यांनी फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळपट्टीवर खूप वेळ घालवला आहे. त्यामुळे, भूतकाळात यशस्वी ठरलेली जोडी पुन्हा वापरता येणे आणि ती येथे प्रत्यक्षात आणता येणे, हे पाहणे खूप समाधानकारक आहे. आशा आहे की आम्ही हे पुन्हा करू. आज संघात एक बदल आहे. दुर्दैवाने अनुष्का दुखापतीमुळे बाहेर आहे आणि आयुषी आज पदार्पण करत आहे.
हेही वाचा : IND vs NZ : राजकोटमध्ये भारताची आकडेवारी चिंता वाढवणारी! न्यूझीलंड ठरू शकतो वरचढ; वाचा सविस्तर
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन: हेले मॅथ्यूज, जी कमलिनी(यष्टीरक्षक), अमेलिया केर, हरमनप्रीत कौर(कर्णधार), निकोला केरी, सजीवन सजना, अमनजोत कौर, संस्कृती गुप्ता, पूनम खेमनार, शबनिम इस्माईल, त्रिवेणी वसिष्ठ
गुजरात जायंट्स प्लेइंग इलेव्हन: बेथ मूनी(यष्टीरक्षक), सोफी डिव्हाईन, ॲशले गार्डनर(कर्णधार), जॉर्जिया वेअरहॅम, भारती फुलमाळी, आयुषी सोनी, कनिका आहुजा, काश्वी गौतम, तनुजा कंवर, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर