
टेस्ट सिरिजआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का
वेगवान गोलंदाज मायकल नेसर झाला संघाबाहेर
13 ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया-बांग्लादेशमध्ये टेस्ट सिरिज
Bangladesh Vs Austrelia Test Series: येत्या 13 ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशमध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. टेस्ट सिरिज सुरू होण्याआधीच ऑस्ट्रेलियाच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज सिरिज सुरू होण्याच्या आधीच संघाबाहेर गेला आहे. दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मायकल नेसर सिरिजबाहेर गेला आहे. नेसरच्या नसण्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढू शकतात.
समोर आलेल्या महितीनुसार, 36 वर्षीय मायकल नेसरला नेटसमध्ये सराव करताना डाव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो अनिश्चित काळासाठी क्रिकेट खेळू शकणार नाहीये. मागील अॅशेस सिरिजमध्ये मायकल नेसर इंग्लंडविरुद्ध त्याने 15 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या संघात असण्याने ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली होती. मात्र आता तो दुखापतीमुळे बाहेर गेला आहे. 13 ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश संघामध्ये दोन सामन्यांची टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे.
David Warner अडचणीत! ड्रिंक अँड ड्राइव्ह प्रकरणात दोषी; जेलची टांगती तलवार
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या गोटातून दुखापतींसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वेगवान गोलंदाज मायकल नेसर दुखापतीमुळे आगामी मालिकेमधून बाहेर पडला आहे, तर यष्टीरक्षक-फलंदाज जोश इंग्लिसच्या तंदुरुस्तीबाबत संघ व्यवस्थापनाने सुटकेचा विश्वास व्यक्त केला आहे. मायकल नेसर गेल्या अनेक वर्षांपासून फिटनेसच्या समस्येशी झुंज देत आहे. बांगलादेशविरुद्धच्या आगामी मालिकेपूर्वी ब्रिस्बेन येथील मैदानात नेटसमध्ये सराव करत असताना त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बांग्लादेश सिरिज खेळू क्षणार नाहीये.
मालिकेचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना: १३ ते १७ ऑगस्ट
दुसरा कसोटी सामना : २२ ते २६ ऑगस्ट
ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स, स्टीव स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लॅबशॅन, कॅमेरॉन ग्रीन, बो वेबस्टर, जेक वेदरल्ड, ॲलेक्स कॅरे, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, नेथन ल्यॉन (स्पिनर), स्कॉट बोलंड.
ग्रहण लागले! बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय; IND Vs BAN दौरा सापडला अडचणीत
बांग्लादेशचा संघ: नझमुल होसेन शांतो, मेहेदी हसन मिराझ, सौम्य सरकार, शदमन इस्लाम, तांझिद हसन तमीम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, अमित हसन, लिटन दास, जाकेर अली, तैजुल इस्लाम (स्पिनर), तास्किन अहमद, हसन महमूद, सय्यद खालेद अहमद, एबादत होसैन चौधरी, मुसफिक हसन.