
मिशेल मार्शने पूर्ण केला 500 रन्सचा टप्पा
लखनौसाठी विक्रम करणारा एकमेव फलंदाज
प्ले ऑफच्या स्पर्धेतून लखनौ बाहेर
Tata IPL LSG/Mitchell Marsh: आयपीएल 2026 मध्ये प्ले ऑफसाठी चुरस अजून सुरू आहे. मात्र मुंबई आणि लखनौचे संघ या आधीच स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. या स्पर्धेत लखनौचा प्रवास कठीण राहिला आहे. कालच्या सामन्यात देखील राजस्थान रॉयल्सने त्यांचा पराभव केला आहे. मात्र लखनौच्या मिशेल मार्श या फलंदाजाने सर्वांची मने जिंकली आहेत. त्याने यंदाच्या हंगामात 500 रन्सचा टप्पा ओलांडला आहे.
मिशेल मार्श हा लखनौचा सलामीचा फलंदाज आहे. त्याने यंदाच्या हंगामात 500 रन्सचा टप्पा पूर्ण केला आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या इतिहासातील मिशेल मार्श हा असा फलंदाज बनला आहे की ज्याने सलग दोन आयपीएल स्पर्धेत 500 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. तर त्याने मागील हंगामात 627 रन्स केल्या होत्या. 2026 मध्ये त्याने 13 सामन्यांमध्ये 563 रन्स केल्या आहेत.
LSG Vs RR Live: जयपूरमध्ये Vaibhav चा झंझावात! रॉयल्स क्वालिफाय करणार? लखनौचा दारुण पराभव
जयपूरमध्ये लखनौचा दारुण पराभव
जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्समध्ये महत्वाचा सामना पार पडला. आयपीएलच्या साखळी सामन्यातील हा अत्यंत महत्वाचा सामना समजला जात होता. राजस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. लखनौने प्रथम 220 रन्स करून राजस्थानला 221 रन्सचे भलेमोठे टार्गेट दिले होते. वैभव सूर्यवंशीने अत्यंत आक्रमक आणि शानदार खेळी केली आहे. अखेर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या प्ले ऑफमध्ये जाण्याच्या आशा अद्याप जिवंत आहेत. पुढील सामना राजस्थानने जिंकल्यास ते टॉप 4 मध्ये दाखल होऊ शकतात. मात्र पराभव झाल्यास दुसऱ्या संघांवर त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे.
फलंदाजी करताना लखनौच्या संघाकडून मिशेल मार्श आणि जोश इंग्लिश हे खेळण्यासाठी मैदानात उतरले. या दोघांनी राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 8 ओव्हर्सपर्यंत मार्श आणि इंग्लिश यांनी जबरदस्त भागीदारी केली. मात्र 9 व्या ओव्हर्समध्ये जोश इंग्लिश आउट झाला. जोश इंग्लिशने 60 रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली.ऋषभ पंत 35 रन्सवर असताना रन आउट झाला. मिशेल मार्श 4 रन्स आपल्या शतकापासून दूर राहिला आहे. तो 96 रन्स करून आउट झाला.