Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs MI: मिशेल मार्शचा मुंबई इंडियन्सविरुद्ध मोठा कारनामा! 10 वर्ष जुन्या विक्रमाला लावला सुरंग.. 

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एलएसजीने बाजी मारली. या सामन्यात सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने 10 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 05, 2025 | 08:18 AM
LSG vs MI: Mitchell Marsh's big feat against Mumbai Indians! Breaks 10-year-old record..

LSG vs MI: Mitchell Marsh's big feat against Mumbai Indians! Breaks 10-year-old record..

Follow Us
Close
Follow Us:

LSG vs MI : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एलएसजीने बाजी मारली. लखनऊमधील इकाना स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी धूळ चारली. या विजयासह एलएसजीचा या हंगमातील दूसरा विजय ठरला, तर मुंबईला मात्र तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.  या सामनामध्ये लखनऊचा सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने चमकदार कामगिरी करून संघाला 203 पर्यंत पोहचवले. त्याने 31 चेंडूत 60 धावा केल्या. दरम्यान मार्शने एक 10 वर्ष जुना रेकॉर्ड देखील मोडला आहे.

या वर्षी लखनौ सुपर जायंट्सकडून खेळताना मिचेल मार्शने हा भीम पराक्रम केला आहे. त्याने शिखर धवनचा विक्रम मोडून मोठी कामगिरी बजावली आहे. आम्ही तुम्हाला पॉवरप्लेच्या विक्रमाबाबत सांगत आहोत. ज्याला मोडणे अशक्य मानले जाते.

हेही वाचा : LSG VS MI : मुंबई इंडियन्सचा IPL 2025 मधील तिसरा पराभव, लखनऊने घरच्या मैदानावर MI ला केलं पराभूत

मिचेल मार्शची तडाखेबाज खेळी..

मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्स संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. सलामीवीर मिचेल मार्श आणि एडन मार्कराम हे फलंदाजीसाठी आले आणि त्यांनी संघाला दणक्यात सुरवात करून दिली. एडन मार्कराम सावध फलंदाजी करताना दिसून आला मात्र दुसरीकडे मिचेल मार्शने मुंबईची हवा टाईट करून ठेवली होती. त्याने 31 चेंडूत 60 धावा चोपल्या त्यामध्ये त्याने 2 षटकार आणि 9 चौकार लगावले.

मार्शकडून शिखर धवनचा विक्रम खालसा..

सलामीवीर मार्करामला फलंदाजीची संधी मिळत नव्हती. मिचेल मार्श बहुतेक चेंडू खेळून काढत  होता. पहिली सहा षटके संपली तेव्हा असे दिसून आले की 36 चेंडूंपैकी केवळ 6 चेंडू मार्करामला खेळता आले आणि उर्वरित 30 चेंडू मिचेल मार्शने खेळून काढले. यापूर्वी हा विक्रम शिखर धवनच्या नावावर होता. जो आता मोडीत निघाला आहे.

हेही वाचा : IPL 2025 : कॅप्टन कूल रिटर्न! MS Dhoni सांभाळणार CSK चे कर्णधारपद? चाहत्यांमध्ये उत्सुकता…

2015 मध्ये धवनची आश्चर्यकारक कामगिरी..

शिखर धवनबाबत सांगायचे झाले तर 2015 च्या आयपीएल हंगामात शिखर धवनने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक चेंडूं खेळले होते. त्यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबादचे संघ आमनेसामने उभे ठाकले होते. त्या सामन्यादरम्यान  शिखर धवनने पॉवरप्लेमध्ये एकूण 29 चेंडू खेळून काढले होते. म्हणजेच मिशेल मार्शने खेळलेल्या चेंडूपेक्षा एकने कमीच.

मुंबई तिसऱ्यांदा पराभूत..

आयपीएल 2025 मुंबईला चांगली कामगिरी करता आली नाही.  लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एलएसजीने विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला 12 धावांनी पराभूत केले आहे. या विजयासह एलएसजीने  या हंगमातील दूसरा विजय आपल्या नावे केला आहे. तर मुंबईला मात्र तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.

 

Web Title: Mitchell marsh breaks 10 year old record lsg vs mi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • Hardik Pandya
  • IPL 2025
  • LSG VS MI
  • Mitchell Marsh
  • Shikhar Dhawan
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 
1

Asia cup 2025 : ‘हे एक मोठे आश्चर्य..’ श्रेयस अय्यरला डावलल्याने भारताचा माजी कर्णधार नाराज.. 

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा
2

Asia cup 2025 : भारतीय संघ नव्या ‘शुभ’ मनाच्या दिशेने; मिस्टर 360 चे कर्णधारपद तात्पुरते? बीसीसीआयकडून इशारा

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या
3

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
4

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.