
Australian Team Downfall Began
2023चा एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंमध्ये अहंकार जाणवला. त्यांनी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एक लाख खेळाडूंना त्यांच्या खेळीतून शांत केलं होतं. पैट कमिंस या शांततने बराच आनंदी झाला होता. तर ड्रेसिंग रुममध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू या विजयाचा उत्सव साजरा करत होते. 2015 नंतर त्यांनी हा पहिला विश्वचषक जिंकला होता. या आनंदात ऑस्ट्रेलियन खेळाडू ट्रॉफीचा आदर करायला विसरला.
मिचेल मार्शलचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. ज्यात त्याने एका हातात बीयरची बाटली घेतलेली दिसत आहे तर त्याने आपले दोन्हीही पाय विश्वचषक ट्रॉफीवर ठेवलेले आहेत. त्यावेळी तो चांगला ट्रोल झाला होता. बऱ्याच जणांनी कमेंट करत त्याला म्हटलं होतं की ट्रॉफीची किंमत तिच लोकं करतात जी त्या ट्रॉफीचा आदर करतात. कदाचित मिचेल मार्शच्या याच चुकीची शिक्षा कदाचित पुर्ण ऑस्ट्रेलियन टीमला भोगावी लागत आहे. या प्रसंगामुळे काहींनी असा विश्वास व्यक्त केला की कदाचित हे कर्मचक्र ऑस्ट्रेलियन संघाला परत फटका देत आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ च्या १९ व्या लीगमध्ये, शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात झिम्बाब्वेने कमालीची कामगिरी केली आणि ऑस्ट्रेलियन संघाला तब्बल 23 धावांनी पराभूत केले. झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी आक्रमक आणि नियंत्रित गोलंदाजी केली. त्यांच्या गोलंदाजी पुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांचा टिकाव लागू शकला नाही. या विजयामुळे झिम्बाब्वेने क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर घडवून आणला आणि कांगारूंचा दबदबा खडबडीत झाला आहे. त्यामुळे 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतरची कृती आजही कांगारुंना भारी पडत असल्याचं बोललं जात आहे.
PAK vs NAM, T20 World Cup : पाकसाठी अस्तित्वाची लढाई; नामिबियाविरुद्ध TOSS जिंकून फलंदाजीचा निर्णय