Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये! मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले, AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य

भारतीय संघाच्या 'प्लेइंग इलेव्हन'मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना स्थान न मिळाल्यामुळे एमआयएम (AIMIM) आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 25, 2026 | 09:27 PM
मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले (Photo Credit- X)

मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • धर्माचे राजकारण आता क्रिकेटमध्ये!
  • मुस्लिम असल्यामुळे Mohammed Shami आणि Siraj ला डावलले
  • AIMIM आणि सपा नेत्यांचे खळबळजनक वक्तव्य
मुंबई: टी-२० विश्वचषकाचा थरार शिगेला पोहोचलेला असतानाच, आता भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंच्या निवडीवरून राजकीय वर्तुळात वादाचा धुरळा उडाला आहे. भारतीय संघाच्या ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना स्थान न मिळाल्यामुळे एमआयएम (AIMIM) आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत. या खेळाडूंना ‘मुस्लिम’ असल्यामुळे संधी नाकारली जात असल्याचे वक्तव्य या नेत्यांनी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

नेत्यांचे वादग्रस्त दावे

मालेगावचे एमआयएम आमदार मुफ्ती इस्माइल यांनी या मुद्द्यावरून सरकार आणि निवड समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “प्रत्येक क्षेत्रात मुस्लिमांना डावलले जात आहे. आता टीम इंडियामध्येही खेळाडूंना त्यांच्या धर्मामुळे संधी दिली जात नसल्याचे चित्र आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा जो पराभव झाला, त्याला हे भेदभावाचे राजकारणही कारणीभूत असू शकते.”

Mumbai, Maharashtra: AIMIM MLA Mufti Ismail Qasmi says, “It is being said that talented players from the Muslim community are being sidelined. Muslim players are being kept out of the team. As a result, the team recently lost. The reason, it is claimed, is that capable Muslim… pic.twitter.com/PTeKtp0pPl — IANS (@ians_india) February 24, 2026

यानंतर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनीही या सुरात सूर मिसळला. “भाजपच्या राजवटीत अनेक क्षेत्रांत मुस्लिमांसोबत भेदभाव होत आहे. जर क्रिकेटसारख्या खेळातही धर्माच्या आधारावर खेळाडूंची निवड होत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. केवळ मुस्लिम असल्यामुळेच शमी आणि सिराज यांना संघाबाहेर ठेवले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही,” असे खळबळजनक आरोप आझमी यांनी केले आहेत.

Abu Azmi : “काँग्रेस अहंकारी झाली, मित्रपक्षांचेही ऐकत नाही…”, सपा नेते अबू आझमी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

सत्ताधारी आणि मित्रपक्षांकडून आरोपांचे खंडन

या वादग्रस्त विधानांनंतर राजकीय वातावरण तापले असून इतर पक्षांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे (NCP) आमदार इदरीस नाईकवडी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “खेळामध्ये धर्माला आणणे पूर्णपणे चुकीचे आहे. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, मन्सूर अली खान पटौदी यांसारखे अनेक दिग्गज मुस्लिम खेळाडू भारतीय संघाचे कर्णधार राहिले आहेत. खेळाडूंची निवड ही त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असते, धर्मावर नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसचे नेते अमीन पटेल यांनीही या विधानांपासून अंतर राखले आहे. त्यांनी हे वक्तव्य बेजबाबदार असल्याचे सांगत, खेळाडूंची निवड ही केवळ त्यांच्या गुणवत्तेवर आणि परिस्थितीनुसार होत असल्याचे म्हटले.

शिवसेना आणि इतर नेत्यांची आक्रमक भूमिका

राज्य सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी एमआयएम आणि सपा नेत्यांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. “हिंदू-मुस्लिम राजकारण करून समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी केवळ कौशल्य लागते, धर्म नाही. असे विधान करणाऱ्या नेत्यांनी देशाची माफी मागायला हवी,” असे गोगावले म्हणाले. तर युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी देखील टीका करताना म्हटले की, “भारतात सर्वोच्च पदांवर मुस्लिम व्यक्ती विराजमान झाल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची खालच्या पातळीवरील राजकारण करणे चुकीचे आहे.”

‘वंदे मातरम’ला विरोध अन् Mangal Prabhat Lodha अबू आझमींविरुद्ध आक्रमक; दिले थेट ‘हे’ आव्हान

Web Title: Mohammed shami and siraj were left out because they were muslims sensational statement by aimim and sp leaders

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 09:27 PM

Topics:  

  • Abu Azmi
  • Mohammad Shami
  • Mohammad Siraj
  • political news

संबंधित बातम्या

Nanded News : ‘महाज्योती’चे प्रशिक्षणच झाले ठप्प; इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था
1

Nanded News : ‘महाज्योती’चे प्रशिक्षणच झाले ठप्प; इंटरनेटची अस्थिरता, वारंवार खंडित होणारी वीजपुरवठा व्यवस्था

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांच्याभोवती फास आणखी आवळला; आता थेट मतदारसंघात ACBची मोठी कारवाई
2

Maharashtra Politics : नरहरी झिरवळ यांच्याभोवती फास आणखी आवळला; आता थेट मतदारसंघात ACBची मोठी कारवाई

Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र
3

Political News : “चीनला उत्तर देण्याची वेळा आली तेव्हा..; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर जोरदार टीकास्त्र

सभापतीपदासाठी जोरदार लॉबिंग; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत; आमदार राजेश विटेकर घेणार अंतिम निर्णय
4

सभापतीपदासाठी जोरदार लॉबिंग; राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत; आमदार राजेश विटेकर घेणार अंतिम निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.