मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि त्याची पत्नी हसीन जहाँ त्यांच्यातील वाद आता पुन्हा एकदा समोर आला आहे. हसीन जहाँने काही वर्षांपूर्वी शमीवर प्राणघातक हल्ला, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि घरगुती हिंसाचार यासारखे अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर हसीन जहाँने आता शमीने तिच्या मुलीसोबतही गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. मोहम्मद शमीची मुलगी हसीन जहाँ ही एक बंगाली अभिनेत्री असून तीने तिच्या आगामी चित्रपटाच्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे आरोप केले आहेत.
हसीन म्हणाला की, शमीला आपल्या मुलीला भेटण्यात रस नाही. इतकंच नाही तर सर्वांनी आपल्या मुलीसोबत वाईट वर्तन केले आहे. इतकी वर्षे झाली, शमीने मुलीला गिफ्टही पाठवलेले नाही. मुलगी मोठी होत असून, तिने याबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. मागच्या वाढदिवसाला मुलगी विचारपूस करत होती, म्हणून मी शमीशी बोलायला सांगितले, गिफ्ट पाठवायला सांगितले. शमीने शंभर रुपयांचे कपडे पाठवले कारण ते रस्त्यावर विकले जातात. ते कपडे खूप छोटे होते. मला आश्चर्य वाटले की करोडो कमवणाऱ्याने आपल्या मुलीसाठी इतके घाणेरडे कपडे पाठवले.
मोहम्मद शमी हा भारताच्या क्रिकेट संघातील एक प्रसिद्ध गोलंदाज असून त्याने भारतासाठी अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा विवाह ७ एप्रिल २०१४ रोजी झाला होता. १७ जुलै २०१५ रोजी शमी देखील मुलीचा बाप झाला होता. काही वर्षांनंतर हसीन शमीवर बलात्कारासारखे गंभीर आरोपही केले आहेत.
तसेच २०१८ साली शमीवर केलेल्या गंभीर आरोपाखाली त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या दोघांमध्ये बराच काळ वाद सुरू असून, मात्र अद्याप घटस्फोट झालेला नाही.