
Oh my god! What did MS Dhoni say about Kohli? He made 'that' thing public for the first time; There was a stir; Watch the video
हेही वाचा : IND vs ENG मालिकेनंतर बेन स्टोक्स नव्या भूमिकेत! हॅरी ब्रुकच्या संघाचा बनला मेंटाॅर
भारताच्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चेन्नईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या दरम्यान, त्याला विराट कोहलीबद्दल देखील काही प्रश्न विचारण्यात आले. धोनीने देखील यावेळी विचारण्यात आलेल्या प्रश्नांची धाडसाने उत्तरे दिली. याआधी देखील धोनीने सहकारी खेळाडू विराट कोहलीबद्दल भाष्य केले होते. पण यावेळी हे विधान काहीतरी विशेष असल्याचे बोलले जात आहे. पहिल्यांदाच त्याने विराटबद्दल एक नवीन गोष्ट सर्वांसंमोर सांगितली आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने यावेळी विराट कोहलीबद्दल मोठा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी विराट कोहलीच्या ४ गुणांबद्दल गप्पा मारल्या. तथापि, त्यांच्या विधानाचा विराट कोहलीच्या फलंदाजीसोबत काही एक संबंध नव्हता. धोनीकडून सांगण्यात आले की, “विराट कोहली एक गायक आहे, तो एक नर्तकही आहे, तो मिमिक्री सुद्धा चांगली करतो. तसेच तो एक संपूर्ण मनोरंजनचे पॅकेज आहे.”
MS Dhoni about Virat Kohli in a recent event in Chennai . “A Good Singer, Dancer, Good in Mimicry and if he is the mood he is very very entertaining!” pic.twitter.com/MnLJmuojQR — Yash MSdian ™️ 🦁 (@itzyash07) August 6, 2025
धोनीकडून सांगण्यात आलेल्या गोष्टी या देखील बरोबर आहेत. विराट कोहली अनेक वेळा मैदानावर मजा करताना दिसून आला आहे. तसेच तो एका कार्यक्रमा दरम्यान मिमिक्री करताना देखील दिसला आहे. त्याच वेळी, विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होतो आहे. ज्यामध्ये तो एका कार्यक्रमादरम्यान हरभजन सिंगसोबत पंजाबी गाणे गाताना देखील दिसून आला होता.