Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई इंडियन्सची IPL 2025 च्या गुणतालिकेत टॉप 4 मध्ये एंट्री! जाणून घ्या संपूर्ण पॉईंट टेबलची स्थिती

हैदराबादचा या स्पर्धेचा सहावा पराभव आहे, आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना होणार आहे याआधी गुणतालिकेची स्थिती काय आहे यावर एकदा नजर टाका.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 24, 2025 | 05:26 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague

फोटो सौजन्य - IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल २०२५ च्या प्लेऑफची शर्यत आता आणखी रोमांचक झाली आहे. आयपीएल २०२५ मधील काल ४१ वा सामना पार पडला, आणि या स्पर्धेमध्ये आता पॉईंट टेबलची स्थिती आणखीच मनोरंजक होत चालली आहे. कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने विजय मिळवून सलग चौथा विजय नावावर केला आहे. तर हैदराबादचा या स्पर्धेचा सहावा पराभव आहे त्यामुळे हैदराबादचा संघ या स्पर्धेमधून जवळ जवळ बाहेरच झाला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्सची देखील सध्या हीच स्थिती आहे. आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना होणार आहे याआधी गुणतालिकेची स्थिती काय आहे यावर एकदा नजर टाका.

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या गुणतालिकेमध्ये सध्या शेवटच्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा संघ आहे. चेन्नईच्या संघाने आतापर्यत ८ सामने खेळले आहेत यामध्ये त्याना २ सामन्यात विजय मिळाला त्याव्यतिरिक्त ते सर्व सामन्यात पराभूत झाले आहेत. त्यानंतर नवव्या स्थानावर हैदराबादचा संघ आहे हैदराबादची देखील स्थिती सारखीच आहे. हैदराबादने देखील फक्त २ सामने जिंकले आहेत. राजस्थान रॉयल्सचा संघ आठव्या स्थानावर आहे. त्यांच्या हाती देखील आतापर्यत २ विजयी सामने आहेत. सातव्या स्थानावर कोलकाता नाईट राइडर्सचा संघ आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली कोलकाताच्या संघ विशेष कामगिरी करू शकला नाही.

Pahalgam Terror Attack : माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने पहलगाम हल्ल्यावरून पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना घेरलं! Post Viral

मुंबई इंडियन्सने सलग चार विजय नोंदवून अनेक संघांचे टेन्शन वाढवले ​​आहे. ९ सामने खेळल्यानंतर, मुंबईने ५ विजय मिळवले आहेत तर ४ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. गुजरात टायटन्स गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि संघाचे १२ गुण आहेत. पुढील ६ सामन्यांपैकी, गिलच्या सैन्याला शेवटच्या चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी फक्त २ सामने जिंकावे लागतील.

दिल्ली कॅपिटल्सचीही गुजरातसारखीच कहाणी आहे. दिल्लीचेही १२ गुण आहेत आणि पुढील ६ सामन्यांमध्ये दोन किंवा तीन विजय संघाला प्लेऑफचे तिकीट मिळवून देतील. तथापि, उर्वरित दोन स्थानांसाठी आरसीबी, मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज शर्यतीत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचे आतापर्यत १० गुण आहेत त्यांनी ८ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना ५ विजय मिळाले आहेत त्याचबरोबर ३ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघाची स्थिती देखील सध्या सारखीच आहे. या तीन संघामध्ये चुरशीची लढत सुरु आहे त्याचबरोबर मुंबई इंडियन्स देखील त्याच रांगेत आहे.

Web Title: Mumbai indians enter top 4 of ipl 2025 points table know the full points table status

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 05:26 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • MI vs SRH

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.