क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर मोठा आरोप : मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्वजण तीव्र निषेध करत आहेत. या हल्ल्यामध्ये २६ निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे संपूर्ण देश यावर संताप व्यक्त करत आहे. भारतीय क्रिकेटपटूंनीही या हल्ल्याची जोरदार टीका केली. बुधवारी इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या ४१ व्या सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला तेव्हा दोन्ही संघांचे खेळाडू काळ्या पट्ट्या घालून मैदानात उतरले होते त्याचबरोबर कालच्या सामन्यांमध्ये कोणतीही आतिषबाजी आणि चिअरलीडर नव्हते.
आता पाकिस्तानी क्रिकेटपटूनेही या हल्ल्यावर टीका केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही घेरले आहे आणि त्यांच्यावर आरोप केले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्यावर मोठा आरोप केला आहे. क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी आताचे X म्हणजेच ट्विटरवर एक एक पोस्ट शेअर केली आहे.
दानिश कनेरिया यांनी आपले मत व्यक्त करताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारला आहे की जर देशाचा पहलगाम हल्ल्याशी काहीही संबंध नसेल तर त्यांनी त्याचा निषेध का केला नाही. याशिवाय, पाकिस्तानच्या खेळाडूने पाकिस्तानी आर्मी म्हणजेच सुरक्षा दल हाय अलर्टवर का आहेत असा प्रश्नही उपस्थित केला होता. त्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांवर ‘सत्य जाणून’ आणि दहशतवाद्यांना ‘आश्रय’ देण्याचा आरोपही केला.
दानिश कनेरिया याने सोशल मीडियावर लिहिले आहे की, “जर पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानची खरोखरच कोणतीही भूमिका नसेल, तर पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी अद्याप त्याचा निषेध का केला नाही? तुमचे सैन्य अचानक हाय अलर्टवर का आहे? कारण तुम्हाला आतून सत्य माहित आहे. तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देत आहात आणि त्यांचे पालनपोषण करत आहात. तुम्हाला लाज वाटली पाहिजे,” दानिशने X वर लिहिले.
If Pakistan truly has no role in the Pahalgam terror attack, why hasn’t Prime Minister @CMShehbaz condemned it yet? Why are your forces suddenly on high alert? Because deep down, you know the truth — you’re sheltering and nurturing terrorists. Shame on you.
— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 23, 2025
दानिश व्यतिरिक्त पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद हाफीजनेही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केले, ‘माझे मन खूप दुःखी आहे.’ तसेच #PahalgamTerroristAttack लिहिले. या घटनेमुळे हाफिजला खूप दुःख झाले आहे हे स्पष्ट आहे.