Hardik Pandya: The cycle of time has turned 360 degrees for me, now at least I will get love from the fans; Hardik Pandya hopes...
Hardik Pandya : भारताने नुकतीच चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफीवर आले नाव कोरले. या स्पर्धेत हार्दिक पंड्याने आपली खास छाप पाडली आहे. त्याने संघाला गरज असताना बॅट आणि बॉलने सर्वतोपरी योगदान दिले आहे. अशातच हार्दिक पंड्या म्हणाला की ‘गेल्या काही महिन्यांत काळाचे चक्र माझ्यासाठी पूर्ण ३६० अंशांनी फिरले, पण कठीण परिस्थितीतही हार न मानण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे मैदानावर खंबीर राहिलो.’ पंड्या तेच्या खाजगी जीवनाबद्दल देखील अनेकवेळा चर्चेत आला होता.
गेल्या वर्षी इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हार्दिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर त्याने भारताच्या टी-२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याने आपल्या टिकाकारांची बोलती बंद केली. पंड्या आता आयपीएलच्या 18 व्या हंगामासाठी तयारी करत आहे. यावेळी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांकडून प्रेम मिळेल अशी आशा या अष्टपैलू खेळाडूला आहे.
२२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलपूर्वी च्या पुढील हंगामापूर्वी जिओ हॉटस्टारशी बोलताना हार्दिक म्हणाला की, मी कधीही हार मानत नाही. माझ्या कारकिर्दीत असे काही वेळा आले जेव्हा माझे लक्ष जिंकण्यापेक्षा खेळात टिकून राहण्यावर होते. मला जाणवले की माझ्यासोबत काहीही घडत असले तरी क्रिकेट नेहमीच माझा खरा मित्र राहील. मी स्वतःला पाठिंबा दिला आणि जेव्हा माझ्या कष्टाचे फळ मिळाले तेव्हा ते माझ्या कल्पनेपेक्षाही जास्त होते. या सहा महिन्यांच्या कालावधीत आम्ही विश्वचषक जिंकला आणि घरी परतल्यावर मिळालेल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने मी भारावून गेलो.
माझ्यासाठी काळाचे चक्र पूर्ण ३६० अंशांनी फिरले होते. जर तो समर्पणाने काम करत राहिला तर तो अधिक मजबूत होऊन परत येईल. ते कधी होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती, पण जसे म्हणतात, नियतीची स्वतःची योजना होती आणि माझ्या बाबतीत, अडीच महिन्यांच्या कालावधीत सर्व काही बदलले. बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमीसोबत नवीन चेंडूवर महत्त्वाची भूमिका त्याने बजावली. गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या भारताच्या टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचाही तो भाग होता. आयपीएलच्या गेल्या हंगामात मुंबई इंडियन्स संघ शेवटच्या स्थानावर राहिला होता. पण हार्दिकला विश्वास आहे की यावेळी त्याचा संघ बराच संतुलित आहे आणि परिस्थिती बदलू शकेल.
पंड्या पुढे म्हणाला की, मी जवळजवळ ११ वर्षापासून आयपीएल खेळत आहे. प्रत्येक हंगाम तुमच्या आत एक नवीन ऊर्जा आणि सकारात्मक भावना घेऊन येतो. गेल्या हंगामात आमच्यासाठी संघ म्हणून निश्चितच आव्हानात्मक होते पण त्याने आम्हाला खूप चांगले धडे दिले. आम्ही २०२५ साठी आमच्या टीमची तयारी करताना या शिकण्याचे विश्लेषण केले आणि ते अंमलात आणले. यावेळी आमच्याकडे खूप अनुभवी संघ आहे. आमच्याकडे असे खेळाडू आहेत जे उच्च स्तरावर क्रिकेट खेळले आहेत आणि ते उत्साहवर्धक आहे.