Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Indians चे वाभाडे निघताच हार्दिकवर आकाश अंबानी नाराज? ‘त्या’ कृतीचा Video Viral

मैदानाबाहेर जात असताना आकाश अंबानींनी प्रेक्षकांकडे पाहून काहीतरी सूचक खुणा केल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता, ते संघाच्या कामगिरीवर आणि मैदानातील बेशिस्त खेळावर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2026 | 04:35 PM
Mumbai Indians चे वाभाडे निघताच हार्दिकवर आकाश अंबानी नाराज? 'त्या' कृतीचा Video Viral

Mumbai Indians चे वाभाडे निघताच हार्दिकवर आकाश अंबानी नाराज? 'त्या' कृतीचा Video Viral

Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्सचा चेन्नईने केला दारुण पराभव
एमआयचे मालक आकाश अंबानी यांचा व्हिडिओ व्हायरल
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह

Akash Ambani Video Viral: काल आयपीएलच्या हंगामातील सर्वात मोठा महामुकाबला वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झाला आहे. 2026 मध्ये प्ले ऑफ मध्ये जाण्याची शक्यता कमी होत चालली आहे. दरम्यान कालचा सामना हातातून गेला असे समजताच मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी स्टेडियम सोडले. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा पुन्हा एकदा लाजिरवाणा पराभव झाला आणि या पराभवानंतर चक्क आकाश अंबानींचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. सामना संपण्याआधीच संतापलेले आकाश अंबानी डगआउट सोडून मैदानाबाहेर निघून गेल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे आता मुंबई इंडियन्सच्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

Akash Ambani left the stadium in mid match 🤯 & asked to fans leaves as well. He is very disappointed to MI performance. Captaincy changes & big decision loading in mid season. pic.twitter.com/B74wJUUAD7 — VIKAS (@Vikas662005) April 24, 2026

मुंबई इंडियन्सचा मागील सामना एका निर्णायक वळणावर असताना हार्दिक सेनेने एकामागून एक चुका केल्या. खराब गोलंदाजीमुळे चेन्नईच्या संघाने 200 पेक्षा जास्त रन्स केल्या. त्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स केवळ 103 रन्स करू शकली. मुंबईचा पराभव होताना दिसत होता. त्यामुळे आकाश अंबानी प्रचंड अस्वस्थ दिसत होते. काही क्षणातच त्यांनी आपली जागा सोडली आणि सामना पूर्ण होण्याची वाट न पाहता ते तडकाफडकी मैदानाबाहेर निघून गेले.

IPL 2026 मध्य रोमांच निश्चित; किंग कोहली Vs प्रिन्स गिल! चिन्नास्वामीवर ‘विराट’ संघर्ष, पहा Playing 11

प्रेक्षकांकडे पाहून ‘ती’ कृती आणि संताप

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये असेही दिसत आहे की, मैदानाबाहेर जात असताना आकाश अंबानींनी प्रेक्षकांकडे पाहून काहीतरी सूचक खुणा केल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहता, ते संघाच्या कामगिरीवर आणि मैदानातील बेशिस्त खेळावर प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते.

GT Vs RCB Pitch Report: गुजरात अन् बंगलोरला खुणावतेय ‘ते’ स्थान; एम. चिन्नास्वामीवर कोण मारणार बाजी?

हार्दिक पंड्याचे कर्णधार पद जाणार?

गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद रोहित शर्माकडून काढून हार्दिक पंड्याकडे देण्यात आले तेव्हापासून मुंबई इंडियन्सचे चाहते देखील प्रचंड नाराज झाले आहेत. मागच्या वर्षी हार्दिकला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. यंदा देखील मुंबई चांगली कामगिरी करत नाहीये. रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपवल्यापासून मुंबई इंडियन्समध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याच्या चर्चा आधीच होत्या. आता आकाश अंबानींची ही जाहीर नाराजी हार्दिकच्या अडचणीत वाढ करू शकते.

Web Title: Mumbai indians loss against csk akash ambani angry leave the wankhede stadium video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • mumbai indians

संबंधित बातम्या

अरे किती उलथापालथ! Hardik Pandya साथ सोडणार? कोण होऊ शकतो MI चा नवा राजा?
1

अरे किती उलथापालथ! Hardik Pandya साथ सोडणार? कोण होऊ शकतो MI चा नवा राजा?

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सचा मोठा गेमप्लॅन! पोलार्डनंतर आता रॉबिन उथप्पाकडे मोठी जबाबदारी; मॅक्लेनघनचीही टीममध्ये एन्ट्री
2

IPL 2027 आधी मुंबई इंडियन्सचा मोठा गेमप्लॅन! पोलार्डनंतर आता रॉबिन उथप्पाकडे मोठी जबाबदारी; मॅक्लेनघनचीही टीममध्ये एन्ट्री

IPL : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा मोठ्या हालचाली, आता ‘हा’ कोचिंग स्टाफ पडला बाहेर
3

IPL : मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा मोठ्या हालचाली, आता ‘हा’ कोचिंग स्टाफ पडला बाहेर

WPL Auction 2027 : सोफी मोलिनेक्ससाठी यूपी वॉरियर्सची १.१० कोटींची बोली; कमलिनी गुजरात जायंट्समध्ये
4

WPL Auction 2027 : सोफी मोलिनेक्ससाठी यूपी वॉरियर्सची १.१० कोटींची बोली; कमलिनी गुजरात जायंट्समध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.