Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : कांथी दत्त यांची 738 किमी सायकल मोहीम यशस्वी; वाशी येथे समारोप उत्साहात साजरा

स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश समुदायाभिमुख फिटनेसला चालना देणे आणि लोकांना सक्रिय व निरोगी जीवनशैलीकडे प्रेरित करणे हा होता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 17, 2026 | 07:39 PM
Navi Mumbai : कांथी दत्त यांची 738 किमी सायकल मोहीम यशस्वी; वाशी येथे समारोप उत्साहात साजरा
Follow Us
Follow Us:
  • कांथी दत्त यांची 738 किमी सायकल मोहीम यशस्वी;
  • वाशी येथे समारोप उत्साहात साजरा
मुंबई : उद्योजक आणि अल्ट्रा डिस्टन्स सायकलिस्ट कांथी दत्त यांनी हैदराबाद ते मुंबई अशी 738 किमी सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. सात दिवसांच्या या प्रवासात त्यांनी तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमधून सायकलिंग करत प्रवास केला. या मोहिमेचा समारोप इनऑर्बिट मॉल, वाशी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात झाला, जिथे फिटनेसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेचा उद्देश समुदायाभिमुख फिटनेसला चालना देणे आणि लोकांना सक्रिय व निरोगी जीवनशैलीकडे प्रेरित करणे हा होता. संपूर्ण प्रवासादरम्यान विविध शहरांतील आणि महामार्गांवरील पोलिस प्रशासनाने दिलेल्या सहकार्यामुळे ही मोहीम सुरक्षित आणि सुरळीत पार पडली.

NZ Vs SA: बेक्कार लाज काढली! दुसऱ्या T-20 मध्ये ‘किवीं’नी आफ्रिकेला ‘इतक्या’ धावांनी केले पराभूत

या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पुण्यात पार पडला, जिथे कांथी दत्त यांनी 500 किमीचा टप्पा फिनिक्स मार्केटसिटी पुणे येथे आयोजित फिटनेस संवाद कार्यक्रमातून साजरा केला. या कार्यक्रमात धावपटू, सायकलिंगप्रेमी आणि फिटनेस उत्साही सहभागी झाले. अभिनेता अयान लाल, उद्योजिका देवयानी पवार आणि न्यूट्रिशनिस्ट अमिता गद्रे यांनीही उपस्थित राहून फिटनेस, युवा सहभाग आणि योग्य आहार व रिकव्हरी याविषयी महत्त्वपूर्ण चर्चा केली.

पुण्यात असताना कांथी दत्त यांनी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिस्त, मानसिक ताकद आणि दैनंदिन जीवनात फिटनेसचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. या संवादातून विद्यार्थ्यांना नियमित व्यायाम आणि सायकलिंगसारख्या सवयी अंगीकारण्याची प्रेरणा मिळाली.या प्रवासाबद्दल बोलताना कांथी दत्त म्हणाले, “ही मोहीम केवळ मुंबई गाठण्यासाठी नव्हती, तर प्रत्येक शहरात फिटनेस आणि मानसिक ताकदीबद्दल संवाद सुरू करण्याचा प्रयत्न होता. या प्रवासादरम्यान विविध लोकांशी झालेला संवाद प्रेरणादायी ठरला. अधिकाधिक लोकांनी सक्रिय आणि निरोगी जीवनशैलीकडे वळावे, हीच अपेक्षा आहे.”

NZ Vs SA: बेक्कार लाज काढली! दुसऱ्या T-20 मध्ये ‘किवीं’नी आफ्रिकेला ‘इतक्या’ धावांनी केले पराभूत

नवी मुंबईतील समारोप कार्यक्रमात अभिनेता अभिषेक बजाज आणि क्रिकेटपटू अभिषेक कपूर विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते.या वेळी अभिषेक बजाज म्हणाले, “अशा प्रकारचे प्रवास आपल्याला सातत्य आणि चिकाटीचे महत्त्व पटवून देतात. इतक्या मोठ्या अंतराचे सायकलिंग करणे हे खूप मोठे आव्हान आहे. अशा उपक्रमांमुळे लोकांना फिटनेसकडे गांभीर्याने पाहण्याची प्रेरणा मिळते.”अभिषेक कपूर यांनीही कांथी दत्त यांचे कौतुक करत म्हटले, “हा एक अत्यंत उल्लेखनीय पराक्रम आहे. इतक्या लांब अंतरावर आणि कठीण परिस्थितीत सायकलिंग करणे सोपे नाही. खेळ माणसाला शिस्त, धैर्य आणि दबाव हाताळण्याची क्षमता शिकवतो, जे दैनंदिन जीवनातही तितकेच महत्त्वाचे आहे. अधिकाधिक लोकांनी कोणताही खेळ निवडून सक्रिय राहावे, हीच अपेक्षा.”

कार्यक्रमाबद्दल बोलताना सिद्धेश मालडीकर, जनरल मॅनेजर – मार्केटिंग आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन, इनॉर्बिट मॉल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले, “इनऑर्बिट मॉल्समध्ये समुदायनिर्मितीला आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. कांथी दत्त यांच्या या 738 किमी मोहिमेचा समारोप वाशी येथे आयोजित करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या प्रवासातून अनेकांना सक्रिय राहण्याची आणि फिटनेस अंगीकारण्याची प्रेरणा मिळेल.”ही मोहीम कांथी दत्त यांच्या ‘द फिअर प्रोजेक्ट’ या उपक्रमालाही अधोरेखित करते, ज्याचा उद्देश सहनशक्तीच्या क्रीडा प्रकारांच्या माध्यमातून मानसिक ताकद वाढवणे आणि स्वतःच्या मर्यादा ओलांडण्याची प्रेरणा देणे हा आहे.या उपक्रमाला सीएसआर अंतर्गत एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि साई सिल्क्स कलामंदिर लिमिटेड यांचे समर्थन लाभले आहे.

NZ Vs SA: बेक्कार लाज काढली! दुसऱ्या T-20 मध्ये ‘किवीं’नी आफ्रिकेला ‘इतक्या’ धावांनी केले पराभूत

Web Title: Navi mumbai kanthi dutts 738 km cycle campaign successful concluding ceremony celebrated with enthusiasm in vashi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 07:39 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • navrashtra news
  • Sports News

संबंधित बातम्या

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
1

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
2

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय
3

याला म्हणतात पॅशन! निकेतची वादळी शतकी खेळी; Spartan Monsoon League मध्ये टायटन बुल्स्‌चा थरारक विजय

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक
4

Navi Mumbai Crime : नवी मुंबईत तोतया पत्रकारांचा सुळसुळाट? वाहनांवर ‘प्रेस-पोलीस’ स्टिकर लावून सर्रास वाहतूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.