Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारताला मोठा झटका! ‘गोल्डन बॉय’ Neeraj Chopra अचानक Asian Games 2026 मधून बाहेर; समोर आलं धक्कादायक कारण

Neeraj Chopra out of Asian Games 2026 after ankle injury: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नीरजने स्वतः याबाबतची माहिती दिली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 29, 2026 | 04:52 PM
Neeraj Chopra out of Asian Games

Neeraj Chopra out of Asian Games

Follow Us
Follow Us:
  • भारताला मोठा धक्का
  • नीरज चोप्रा Asian Games मधून बाहेर
  • नीरजने सोशल मीडियावर दिली माहिती
भारताचा स्टार भालाफेकपटू आणि दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता आणि नीरज चोप्रा २०२६ हंगामातील उर्वरित सर्व स्पर्धांमधून बाहेर पडला आहे. नीरजने स्वतःच याची पुष्टी केली आहे . नीरज दुखापतीमुळे या हंगामात पुढील कोणतीही स्पर्धा खेळू शकणार नाही. तसेच, तो जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा २०२६ स्पर्धा आणि डायमंड लीगच्या अंतिम सामन्यासह कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही. लुसाने येथे नुकत्याच झालेल्या डायमंड लीग स्पर्धेदरम्यान ८८.०५ मीटरचा सर्वोत्तम भालाफेक केल्यानंतर झालेल्या दुखापतीमुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. नीरजने स्वतःही माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

Auqib Nabi साठी BCCI चा ‘स्पेशल प्लॅन’! न्यूझीलंड दौऱ्याआधी इंग्लंडला पाठवणार; काय आहे खास कारण?

नीरज चोप्राने सोशल मीडियावर दिली माहिती

नीरज चोप्राने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्याच्या दुखापतीबद्दल आणि हा सीझन न खेळण्याच्या निर्णयाबद्दल पोस्ट केली. नीरजने लिहिले की, ‘खूप मेहनतीनंतर,लुसानेमध्ये माझ्या ‘सीझनमधील सर्वोत्तम थ्रो’मुळे मला अखेर मोमेंटम मिळाला आहे. दुर्दैवाने, त्यानंतर लगेचच, सरावादरम्यान माझ्या घोट्यातील लिगामेंट फाटली. माझे डॉक्टर आणि टीमशी चर्चा केल्यानंतर, आम्ही ठरवले आहे की मी या सीझनच्या उर्वरित सामन्यांमध्ये सहभागी होणार नाही.’

त्याने पुढे लिहिले की, ‘हे निराशाजनक आहे, कारण मला वाटत होते की मी माझी लय शोधली आहे, पण ते म्हणतात ना, अडथळा हे प्रवासाचाच एक भाग असतात. आता माझे लक्ष फक्त व्यवस्थित बरे होण्यावर आणि पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने कमबॅक करण्यावर आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद.’

pic.twitter.com/LwounijYk7 — Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) August 29, 2026

भारताच्या आशांना मोठा धक्का

या दुखापतीमुळे नीरज चोप्रा जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाही, हा भारतासाठी एक मोठा धक्का आहे. नीरजच्या अनुपस्थितीमुळे भारताला ॲथलेटिक्समधील एक संभाव्य पदक गमवावे लागेल. आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबरपासून सुरू होऊन ४ ऑक्टोबरपर्यंत चालतील. परंतु,, भारताचा ‘गोल्डन बॉय’ नीरजने पुरुषांच्या भालाफेकीतील आपले विजेतेपद राखण्याची संधी गमावली आहे.

२०२६ च्या हंगामात नीरज चोप्राची कामगिरी

२८ वर्षीय नीरज चोप्रासाठी २०२६ चा हंगाम संमिश्र स्वरूपाचा होता. दुखापतीमुळे दीर्घकाळ खेळापासून दूर राहिल्यानंतर, नीरजने जूनमध्ये दोहा डायमंड लीगमध्ये पुनरागमन केले आणि ८५.६९ मीटर थ्रो करून चौथे स्थान पटकावले. त्यानंतर त्याने ग्लासगो येथे झालेल्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८५.८३ मीटरच्या कामगिरीसह रौप्य पदक जिंकले आणि मग लुसाने डायमंड लीगमध्ये आपल्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. नीरजने लुसाने डायमंड लीगमध्ये ८८.०५ मीटरची सर्वोत्तम कामगिरी करत दुसरे स्थान पटकावले.

Asia Cup 2026: आता होणार असली टक्कर! थायलंडविरुद्ध ‘दंगल’साठी टीम इंडिया सज्ज; Playing XI मध्ये कोणाला मिळणार संधी?

Web Title: Neeraj chopra out of asian games after ankle injury ends his 2026 season

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • javelin throw
  • Neeraj Chopra

संबंधित बातम्या

Asian Games 2026: जपानच्या सुविधांवर BCCI नाराज? आशियाई स्पर्धेसाठी ‘B’ टीम पाठवणार; स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती
1

Asian Games 2026: जपानच्या सुविधांवर BCCI नाराज? आशियाई स्पर्धेसाठी ‘B’ टीम पाठवणार; स्टार खेळाडूंना मिळणार विश्रांती

Asian Games: क्रिकेट शेड्युल आले समोर, भारतीय Men’s आणि Women’s टीमचे सामने, कधी आणि कोणाशी लढणार
2

Asian Games: क्रिकेट शेड्युल आले समोर, भारतीय Men’s आणि Women’s टीमचे सामने, कधी आणि कोणाशी लढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.