
विद्यमान राष्ट्रीय विजेती नीरूने पात्रता फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत १२५ पैकी १२१ गुण मिळवून पदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले. आठ जणांच्या अंतिम सामन्यात तिने सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. अंतिम सामना शेवटच्या शॉटपर्यंत रोमांचक राहिला. शेवटच्या दोन शॉट्सपूर्वी दोन्ही नेमबाज प्रत्येकी २५ गुणांवर बरोबरीत होते. दबावाच्या क्षणी कॉर्मेनियरचा नेम चुकला, तर नीरूने संयम दाखवत ३० पैकी २७ लक्ष्ये भेदून सुवर्णपदाकावर आपले नाव कोरले.
फ्रान्सच्या माजी विश्वविजेत्या कॅरोल कार्मेनियरने २५ गुणांसह रौप्य पदक जिंकले, तर यजमान इटलीच्या एरिका सेसाने कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेतील भारताची दुसरी नेमबाज, मनीषा कीर, १२५ पैकी ११७ गुण मिळवून पात्रता फेरीत १० व्या स्थानावर राहिली आणि अंतिम फेरीत स्थान मिळवू शकली नाही.
🇮🇳 Neeru hits 27 in a tense Trap Women Final to earn India their first shotgun gold of the 2026 World Cup season.#ISSF #ShootingSport pic.twitter.com/szOe4ckdyb — ISSF (@issf_official) July 11, 2026
नीरू धांडा सुवर्णपदकावर आनंद व्यक्त करत म्हणाली की, ‘येथे येण्यापूर्वी मी लंडनमध्ये १० दिवस सराव केला. मला खात्री होती की मी जिंकेन. मला एका क्षणासाठीही भीती वाटली नाही. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणे हे माझे पुढचे ध्येय आहे. ‘
पॅरिस २०२४ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिल्व्हाना स्टँकोसाठी मायदेशातील ही स्पर्धा निराशाजनक ठरली. विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जाणारी स्टँको, पदक फेरीमधून बाद होणारी पहिली नेमबाज ठरली.
CSK च्या ऐतिहासिक पर्वाचा शेवट! ७ किताब जिंकून देणाऱ्या दिग्गजाची 18 वर्षांनंतर टीममधून एक्झिट