सीएसकेपासून वेगळे झाल्यानंतर फ्लेमिंग म्हणाले की, क्रीडाविश्वातील १८ वर्षे हा खूप मोठा काळ आहे आणि मी येथून अनेक आठवणी घेऊन जात आहे. चेन्नई सुपर किंग्ससोबतचा माझा काळ हा माझ्या प्रशिक्षक कारकिर्दीतील सर्वात मोठा प्रवास राहिला आहे. आम्ही एकत्र मिळून जे काही मिळवले आहे, त्याचा मला अभिमान आहे. आम्ही एकत्र अविस्मरणीय विजय साजरे केले, कठीण प्रसंगांना तोंड दिले आणि अशा आठवणी निर्माण केल्या ज्या माझ्यासोबत कायम राहतील. सीएसके माझ्या हृदयाच्या नेहमीच जवळ राहील आणि मी येत्या काळातही या संघाला प्रोत्साहन देत राहीन.
OFFICIAL ANNOUNCEMENT The Super Kings and Head Coach Stephen Fleming have mutually decided to part ways.
Together, we shared one of the most successful and enduring partnerships in IPL history. The legacy you’ve built will continue to inspire us. With immense respect and… pic.twitter.com/qjvb4oZUuU — Chennai Super Kings (@ChennaiIPL) July 13, 2026
आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच २००८ मध्ये स्टीफन फ्लेमिंग हे चेन्नई सुपर किंग्स संघात खेळाडू म्हणून सामील झाले. यानंतर २००९ साली त्यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. सीएसके आणि फ्लेमिंग गेल्या १७ वर्षांपासून एकत्र आहेत आणि या फ्रँचायझीने अनेक यश मिळवले आहेत. फ्लेमिंगच्या मार्गदर्शनाखाली सीएसकेने यशाची नवी उंची गाठली. त्यांच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच आयपीएल ट्रॉफी आणि दोन वेळा चॅम्पियन्स लीग टी२० चे विजेतेपद पटकावले. एवढंच नाही तर, सीएसकेने विक्रमी १२ वेळा प्लेऑफमध्ये आणि १० वेळा आयपीएलच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे.
सीएसकेने (CSK) आयपीएलमध्ये शेवटची ट्रॉफी २०२३ मध्ये जिंकली होती. पण तेव्हापासून संघाची कामगिरी चांगली निराशाजनक राहीली. सीएसके संघ सलग तीन हंगामात प्लेऑफसाठी पात्रही ठरू शकला नाही. २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये संघाचा प्रवास गट फेरीतच थांबला. २०२४ मध्ये सीएसके पाचव्या स्थानावर राहिला, तर २०२५ मध्ये तो १० व्या स्थानावर तळाशी होता. याउलट, २०२६ च्या हंगामात संघाने आठव्या स्थानावर आपला प्रवास संपवला.






