Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लवकरच ‘माही मार रहा है’ ऐकू येणार? KKR विरुद्ध MS Dhoni आज CSK कडून खेळण्याची शक्यता

यंदाच्या हंगामात महेंद्रसिंह धोनी अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. त्यामुळे त्याची उणीव चेन्नईच्या संघाला जाणवत आहे. मध्यंतरी धोनी नेटमध्ये सराव करत असल्याचे समोर आले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 14, 2026 | 04:24 PM
लवकरच 'माही मार रहा है' ऐकू येणार? KKR विरुद्ध MS Dhoni आज CSK कडून खेळण्याची शक्यता

लवकरच 'माही मार रहा है' ऐकू येणार? KKR विरुद्ध MS Dhoni आज CSK कडून खेळण्याची शक्यता

Follow Us
Follow Us:

एमएस धोनीला ईम्पॅक्ट प्लेयर खेळवले जाण्याची शक्यता
आज चेन्नई विरुद्ध केकेआर येणार आमनेसामने 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना

MS Dhoni For CSK: आज चेपॉक स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. दरम्यान दुखापतग्रस्त असल्यामुळे एम. एस. धोनी चेन्नईकडून अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. दरम्यान तो आज खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा सामना आज संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

न्यूझीलंडचे माजी खेळाडू मिचेल मॅक्लेनाघन यांनी धोनीबद्दल बोलताना सांगितले की, जर धोनी फिट असेल तर चेन्नई सुपर किंग्सने त्याला ‘ईम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून मैदानात उतरवायला हवे. जर संघ व्यवस्थापनाला असे वाटत असेल की त्यांना धोनीकडून काही धावांची गरज आहे, विशेषतः जेव्हा संघ धावांचा पाठलाग करत असेल, तेव्हा त्याला ‘इम्पॅक्ट सब’ म्हणून आणल्यास त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेचा सर्वोत्तम वापर करता येईल.

एमएस धोनी आज खेळणार?

एम. एस. धोनी चेन्नई सुपर किंग्ज आणि चाहत्यांसाठी खास आहे. तर धोनीसाठी देखील सीएसके आणि सीएसकेचे चाहते हे अत्यंत खास आहेत. दरम्यान दुखापत झाल्यामुळे यंदाच्या हंगामात महेंद्रसिंह धोनी अद्याप एकही सामना खेळू शकलेला नाही. त्यामुळे त्याची उणीव चेन्नईच्या संघाला जाणवत आहे. मध्यंतरी धोनी नेटमध्ये सराव करत असल्याचे समोर आले होते. मात्र आजच्या सामन्यात तो खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

CSK Vs KKR Pitch Report: ‘केकेआर’ पराभवाचा चौकार लगावणार की…; कसे असणार आजचे पीच?

सीएसके विरुद्ध केकेआर पीच रिपोर्ट

एम.ए. चिदंबरम स्टेडियमची आजची खेळपट्टी थोडीशी वेगळी असल्याचे म्हंटले जात आहे. पहिल्यांदा हे पीच स्लो होते. मात्र आता लाल मातीमुळे येथे पीच थोडे फास्ट असे झाले आहे. सुरुवातीला फलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र मधले काही ओव्हर्स स्पिनर्सला फायदा होताना दिसेल. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे थोडे अवघड जाऊ शकते. त्यामुळे टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो.

चेन्नईमधले आजचे वातावरण स्वच्छ आणि मोकळे राहण्याचा अंदाज आहे. दिवसा येथील तापमान 34 डिग्रीपर्यंत जाऊ शकते. संध्याकाळी ते 27 पर्यंत येऊ शकते. आज या ठिकाणी पावसाची कोणतीही शक्यता नाहीये. दुसऱ्या डावात दव पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काहीसा फरक जाणवू शकतो.

CSK ला चीतपट करण्यासाठी KKR ने आखला मास्टरप्लॅन; दोघांची Playing 11 अन्…; वाचा सविस्तर

सीएसकेची संभाव्य टीम: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), संजू सॅमसन , आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, सरफराज खान, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, अकिल हुसेन , नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुर्जनप्रीत सिंग, कार्तिक शर्मा.

केकेआरची संभाव्य टीम:  अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ॲलन, कॅमेरून ग्रीन, अँगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, रमणदीप सिंग, सुनील नरीन, नदीप सैनी, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती

Web Title: Newzealand player said ms dhoni play impact player for csk against kkr ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • CSK
  • IPL 2026
  • M.S. Dhoni

संबंधित बातम्या

IND Vs ENG: चर्चा तर होणारच! शुभमन गिलने सामना जिंकला पण…; MS Dhoni चा व्हिडिओ Viral
1

IND Vs ENG: चर्चा तर होणारच! शुभमन गिलने सामना जिंकला पण…; MS Dhoni चा व्हिडिओ Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.