निकोलस पूरनकडे केएल राहुलचा रेकॉर्ड मोडण्याची संधी (फोटो- सोशल मिडिया)
लखनौ विरुद्ध दिल्ली सामना सुरू
दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाजीचा निर्णय
निकोलस पुरनकडे रेकॉर्ड मोडण्याची संधी
KL Rahul Most Runs Record/Nicholas Pooran: आयपीएलच्या महापर्वातील आज 5 वा सामना सुरू आहे. सध्या लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना सुरू आहे. कर्णधार अक्षर पटेलने प्रथम लखनौला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान लखनौचा खेळाडू असलेल्या निकोलस पूरनकडे आज केएल राहुलचा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.
केएल राहुल सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. या आधी तो लखनौच्या संघाकडून खेळत होता. तेव्हा त्याने लखनौच्या संघासाठी सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. आज तो रेकॉर्ड मोडण्याची संधी लखनौच्या निकोलस पूरनकडे आहे. केएल राहुलने 38 सामन्यांमध्ये 1410 धावा लखनौसाठी केल्या आहेत.
दरम्यान केएल राहुल लखनौचा माजी कर्णधार देखील आहे. सध्या तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. दरम्यान निकोलस पूरनने लखनौच्या संघासाठी आतापर्यंत 43 सामन्यांमध्ये 1381 धावा केल्या आहेत. जर आजच्या सामन्यात निकोलस पूरनने 30 धावा केल्या, तर तो माजी कर्णधार केएल राहुलचा रेकॉर्ड मोडू शकतो.
LSG vs DC IPL Live Updates: दिल्ली कॅपिटल्सने घेतला ‘हा’ निर्णय; ऋषभ पंतची लागणार कसोटी
सध्या निकोलस पूरन लखनौसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर आयुष बडोनीने 963 धावा केल्या असून तो तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान आज निकोलस पूरनला लखनौसाठी सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड करता येणार आहे. त्याने आज 30 धावा केल्यास तो केएल राहुलचा रेकॉर्ड मोडणार आहे.
लखनौच्या डावाला सुरुवात
दिल्ली कॅपिटल्सकडून तिसरी ओव्हर टाकण्यासाठी मुकेश कुमार याला संधी देण्यात आली. दरम्यान मिशेल मार्श स्ट्राईकवर होता. मुकेशकुमारने टाकलेला बॉल मिशेल मार्शने सरळ फटकावला. दरम्यान तो बॉल मुकेश कुमारच्या हाताला लागून तो बॉल स्टंपला लागला. दुसऱ्या बाजूला ऋषभ पंत नॉन स्ट्राईकवर होता. मात्र तो क्रीजच्या बाहेर असल्याने ऋषभ पंत बाद झाला.
आज IPL मध्ये राडा! LSG कडून Rishabh Pant ‘या’ नंबरवर खेळणार? कोच म्हणाले, “तुम्हाला इथे बसून…”
दिल्ली कॅपिटल्सची टीम: के.एल. राहुल, पथुम निसंका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी
एलएसजीची टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी






