जगाच्यापाठीवर फुटबॉल (Football) हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉल म्हटलं तर साहजिकपणे फुटबॉल मधील धुरंदर खेळाडू असलेल्या मेस्सी आणि रोनाल्डोच नाव समोर येतच. या दोन दिगज्जांनी मागील कित्येक वर्षे फुटबॉल हा खेळ खेळत, सोबत बक्कळ कमाईसुद्धा केली. मात्र आता कमाईच्या बाबतीत ह्या दोघांना एका २२ वर्षीय फुटबॉलपटूने मागे टाकलंय आहे. तो खेळाडू म्हणजे मेस्सीच्याच पॅरिस सेंट जर्मन संघातील फ्रेंच साथीदार किलियन एमबाप्पे(Kylian Mbappe).
फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या फुटबॉलपटूंच्या यादीत पीएसजीच्या (Paris saint German) या स्टार फॉरवर्डने सहकारी लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि मँचेस्टर युनायटेडचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) यांना मागे टाकले आहे. फुटबॉलपटून मधील मेस्सी आणि रोनाल्डोच्या प्रतिष्ठित जोडीला कमाईच्या बाबतीत मागे टाकत मोठी झेप घेण्याची मागील नऊ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.
यापूर्वी २०१३ मध्ये रोनाल्डो किंवा मेस्सी व्यतिरिक्त या यादीत अव्वल स्थान मिळवणारा शेवटचा खेळाडू इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम (David Beckham) होता. एमबाप्पे या मोसमात USD १२८ दशलक्ष कमावणार आहे. दरम्यान, दुसऱ्या स्थानावर असलेला मेस्सी USD १२० दशलक्ष आणि तिसऱ्या स्थानावर असलेला रोनाल्डो USD १०० दशलक्ष कमवेल असा अंदाज आहे. एमबाप्पे (kylian mbappe) अलीकडे EA Sports ‘FIFA 23’ या व्हिडिओ गेमच्या मुखपृष्ठावर दिसला. यासोबतच एमबाप्पेने Nike, Dior, Hublot, Oakley आणि Panini सारख्या ब्रँड एंडोर्समेंटद्वारे कमावलेल्या रकमेचा अंदाज जवळपास USD १८ दशलक्षच्या घरात आहे.