(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे लहान चिरंजीव बॉबी देओलने 1995 साली बरसात या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. करिअरच्या सुरुवातीला चांगली गती घेतल्यानंतर काही काळ त्याचं करिअर मंदावलं, मात्र सध्या तो ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बॉबी देओल अनेकदा त्याचा भाऊ सनी देओलची प्रशंसा करताना दिसतो. दे दोन्ही भाऊ एकमेकांवर इतके प्रेम करतात की, ते अडचणीतही एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. बरसात या त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कसा अपघात झाला आणि सनी देओलने त्याच्या भावाला कसे वाचवले ते सांगितलं.
रेडिओ नशा या प्लॅटफॉर्मवर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉबी देओलने आपल्या करिअरबाबत, आणि विशेषतः मोठ्या भाऊ सनी देओल याच्या मिळालेल्या पाठिंब्यासंदर्भात बोला, या मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला, मला अजूनही तो क्षण आठवतो की, इंग्लंडमध्ये शूटिंग सुरू होतं, मी घोडेस्वारी करीत असताना माझा घोडा दुसऱ्या घोड्यला धडकला. त्यामुळे माझा तोल गेला आणि मी जमिनीवर पडलो. मला जाणवले की, माझ्या पायाला काहीतरी झाले आहे. मी उठण्याचा प्रयत्न केला, पण पण लगेच परत पडलो. भय्या ( सनी देओल तिथेच होता. त्यानं मला त्याच्या खांद्यावर उचललं आणि तो मला तिथून घेऊन गेला.”
मुलगी झाली हो! अरबाज खान आणि शूरा खानने दिली आनंदाची बातमी, खान कुटुंबात नव्या सदस्याची एन्ट्री
बॉबी देओल म्हणाला की, सनी देओल तिथे असल्यानं त्याला असं वाटकं की, काहीही चुकीचं होऊ शकत नाही, पण कदाचित पुढे जे घडलं, त्यासाठी तो तयार नव्हता. बॉबी देओलने सांगितलं की, सनी देओलनं त्याला जवळच्या रूग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी त्याचा पाय बरा होऊ शकत नाही, असं सांगितलं. सनी देओलने त्याच रात्री त्याचा भाऊ बॉबीला एअरलिफ्ट करून लंडनला नेले. . हेलिकॉप्टरने लंडनला पोहोचल्यानंतर बॉबी देओलवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याचा पाय बरा झाला.
स्टार किड्स लॉंच करणाऱ्या करण जोहराला वाटते आपल्या मुलांनी अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करिअर करावं
बॉबी देओल पुढे म्हणाला, त्या घटनेला ३० वर्षे उलटून गेली आहेत; पण त्याच्या पायात अजूनही रॉड आणि स्क्रू आहेत, असे तो म्हणाला. बॉबी देओल म्हणाला की, वेळेवर उपचार मिळाल्यानं आज तो केवळ त्याच्या पायावर उभा राहू शकत नाही, तर तो नाचू शकतो, उडी मारू शकतो, अॅक्शन सीन करू शकतो.