NZ vs PAK T20 : 6,6,6 आणि पुन्हा 6…! न्यूझीलंडच्या 'या' वादळात पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी नेस्तनाबूत..(फोटो-सोशल मिडिया)
NZ vs PAK T20 : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेचे यजमानपद न्यूझीलंडकडे आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत मालिकेतील 2 सामने खेळले गेले असून दोन्ही सामन्यात न्यूझीलंड संघाने पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा 9 गडी राखून मोठ्या फरकाने पराभव केला, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 11 चेंडू शिल्लक असताना सामना आपल्या नावे केला. न्यूझीलंडने या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे.
पाकिस्तान क्रिकेट संघाची अवस्था दिवसेंदिवस अतिशय खालावत चालली आहे. पाकिस्तानकडे यजमानपद असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तान संघाला साखळी सामन्यात आपल्या गाशा गुंडाळाव्या लागलया होत्या. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता न्यूझीलंडने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत शानदार विजय मिळवला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान संघावर जोरदार टीका होत आहे.
आता दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानी संघ सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तान संघाने न्यूझीलंडला 136 धावांचे आव्हान दिले होते. न्यूझीलंड संघाने हे लक्ष 11 चेंडू शिल्लक असतानाच पूर्ण केले. पावसामुळे हा सामना १५ षटकांचा ठेवण्यात आला होता.
हेही वाचा : NZ vs PAK 2nd T20: न्यूझीलंडकडून पाकिस्तानला पुन्हा धोबीपछाड; दुसरा T20 सामनाही टाकला खिशात..
न्यूझीलंडच्या विजयात ओपनर बॅट्समन टीम सेफर्टने महत्त्वाची भूमिका वठवली आहे. त्याने केवळ 22 चेंडूत तीन चौकार आणि पाच षटकारांची आतिषबाजी करत 45 धावा केल्या. याशिवाय सेफर्टने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या एकाच षटकात 4 षटकार मारून त्याची हवाच काढून टाकली. यानंतर न्यूझीलंडच्या टीम सेफर्टचे सर्वत्र कौतुक होत आहे. तर दुसरीकडे, सर्वजण पाकिस्तानच्या गोलंदाजांना ट्रोल करताना दिसून येत आहेत.
शाहीनच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टीम सेफर्टने लांब षटकार लगावला. यानंतर टीमने दुसऱ्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने षटकार मारला. पण, तिसरा चेंडू डॉट गेला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर टिमने बॅकवर्ड पॉइंटकडे दोन धावा काढल्या. त्यानंतर टीमने ओव्हरच्या पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकून आफ्रिदीची हवा टाय टाय फिस्स करून टाकली. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी शाहीनची खूपच टर उडवली. केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानी क्रिकेट चाहते देखील शाहीन शाह आफ्रिदीची खिल्ली उडवताना दिसत आहेत.
Seifert has 7 letters, so does Maximum 🤌
Tim Seifert took Shaheen Afridi to the cleaners in his second over, smashing four sixes in it 🤯#NZvPAK pic.twitter.com/F5nFqmo7G6
— FanCode (@FanCode) March 18, 2025
दुसरा टी-२० सामना पावसामुळे उशिरा सुरू करण्यात आला. सामन्यातील षटके कमी केल्यानंतर हा सामना १५ षटकांचा करण्यात आला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 15 षटकांत 9 गडी गमावून 135 धावांपर्यंत मजल मारली. पाकिस्तानकडून कर्णधार सलमान आगाने 28 चेंडूत ४६ धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र आपली छाप पाडता आली नाही.
1st over 2nd over pic.twitter.com/rVBMiE6yWm
— Out Of Context Cricket (@GemsOfCricket) March 18, 2025
पाकिस्तानने दिलेल्या 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने चांगली कामगिरी केली. न्यूझीलंडने केवळ 13 षटकांमध्ये 137 धावा करत 5 विकेट राखून विजय मिळवला. पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे न्यूझीलंड संघाने पहिल्या T20 सामन्यात पाकिस्तानचा 61 चेंडूत आणि दुसऱ्या सामन्यात 79 चेंडूत पराभव केला होता.