Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मुख्यमंत्री होण्याची ऑफर…’, माजी क्रिकेटर ‘दादा’ गाजवणार राजकीय मैदान? अखेर सौरव गांगुलीने मौन सोडले.. 

भारतीय क्रिकेट संघाचा  माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने राजकारणात येण्याबाबत मौन सोडले आहे. त्याचे नाव नेहमी कोणा ना कोणा राजकीय पक्षासोबत जोडले जात आले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 22, 2025 | 09:13 PM
'Offer to become Chief Minister...', will former cricketer 'Dada' enter the political arena? Finally, Sourav Ganguly breaks his silence..

'Offer to become Chief Minister...', will former cricketer 'Dada' enter the political arena? Finally, Sourav Ganguly breaks his silence..

Follow Us
Close
Follow Us:

Sourav Ganguly on politics : भारतीय क्रिकेट संघाचा  माजी कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली नेहमीच आपल्या  स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखला जातो. अशातच त्याने आपल्याला राजकणात येण्यास कोणताही रस नाही असे स्पष्ट सांगितले. गांगुली म्हणाला की, दरवर्षी त्याला राजकारणात येण्याच्या ऑफर येत असतात, परंतु ते त्याच्या स्वभावाला अनुरूप नसल्याचे त्याचे म्हणणे आहे.

२०२६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. याबाबत गांगुलीला विचारण्यात  आले की, तो कोणत्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकतो का? तेव्हा त्यावर तो हसला आणि  म्हणाला  की, मला रस नाही. जरी मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली गेली तरी तो त्यासाठी तयार होणार नाही.  गांगुली म्हणाला की, ‘तुम्हाला वाटते तितके ते सोपे नाही. मला दरवर्षी राजकारणात येण्याच्या ऑफर येतात, परंतु मला वाटत नाही की ते माझ्या नियंत्रणात आहे.”

हेही वाचा : IND Vs ENG : जसप्रीत बूमराहचा पंजा; इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर संपला, भारताकडे ६ धावांची आघाडी..

पुढे गांगुलीने  के कबूल केले की देश आणि राज्याची प्रगती थेट सरकार आणि त्याच्या नेतृत्वाशी जोडलेली आहे, म्हणून गांगुली एक नागरिक म्हणून राजकारणावर लक्ष ठेवून असतो. गांगुली म्हणाला की, “मी राजकारणात नाही, पण मी पाहतो, कारण राज्य आणि देशाची प्रगती कोण राज्य करत आहे यावर निर्भर असते.”

राजकारणात येण्याबाबत सतत ऑफर..

गेल्या काही वर्षांमध्ये सौरव गांगुलीचे नाव भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांसोबत जोडले जात आहे. २०२१ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील ते भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशी चर्चा झाली होती, परंतु तेव्हा गांगुलीने तेव्हाही राजकीय इनिंग सुरू करण्यास स्पष्ट  नकार दिला होता. आता २०२६ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा गांगुली राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा तीव्र होत आहेत, परंतु त्यांच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की गांगुली सध्या राजकारणात येण्याच्या मानसिकतेत नाही.

हेही वाचा : ‘रोहित-कोहली २०२७ च्या विश्वचषकात दिसणार नाहीत’, माजी भारतीय खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी…

तसेच गांगुलीने त्यांच्या बायोपिकबद्दल देखील एक मोठा खुलासा केला आहे. गांगुलीने सांगितले की “त्याचा बायोपिक २०२६ च्या अखेरीस प्रदर्शित होणार असून त्यामध्ये राजकुमार राव  मुख्य भूमिका सकरणार आहे.  तसेच जानेवारी २०२६ पासून चित्रीकरण सुरू होणार आहे.'”

Web Title: Offer to become chief minister former cricketer sourav ganguly breaks silence on politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 09:13 PM

Topics:  

  • Sourav Ganguly
  • West bengal
  • west bengal election

संबंधित बातम्या

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’
1

TMC Congress Alliance: टीएमसी-काँग्रेस अलायन्सला लागणार पूर्णविराम? बिहारच्या निकालाने बंगाल निवडणुकांचा बिघडवला ‘गेम’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.