टिम इंडिया(फोटो-सोशल मीडिया)
IND Vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जून पासून सुरवात झाली आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या कसोटी पहिल्या डावात टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध एकूण ४७१ धावा उभारल्या. यादरम्यान सलामीवीर यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या तिघांनी दमदार शतकं ठोकली आहेत. प्रतिउत्तरात इंग्लंडने ऑली पोपचे शतक आणि हॅरी ब्रूकच्या ९९ धावांच्या जोरावर ४६५ धावा केल्या. भारताला ६ धावांची छोटी आघाडी मिळाली. भारताकडून जसप्रीत बूमराहने ५ विकेट्स मिळवल्या. तर प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट मिळवल्या.
भारताच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या शेवटी इंग्लंडने पहिल्या डावात तीन विकेट गमावून २०९ धावा केल्या होत्या, तर तिसऱ्या दिवसाच्या खेळात इंग्लंडने ४०० धावांचा टप्पा ओलांडाला. यामध्ये इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकने शानदार अर्धशतक करत संघाचा डाव सावरला. या दरम्यान त्याला तीन जीवनदान मिळाले. तरी देखील त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो ९९ धावांवर बाद झाला.
तिसऱ्या दिवशी हॅरी ब्रूकने संघाची सारी सूत्रे हातात घेतली आणि भारतीय गोलंदाजवर चांगलाच हल्लाबोल केला. या दरम्यान त्याला तीन जीवनदान मिळाले. त्याचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. नजाकत असलेले फटके मारले. त्याने भारतीय गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. तो आपले शतक पूर्ण करणार असे वाटत असताना प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो शार्दुल ठाकूरकडे झेल दुण बसला आणि त्याचे शतक हुकले. ब्रूकने ११२ चेंडूचा सामना करत ९९ धावा केल्या. यामध्ये त्याने ११ चौकार आणि २ षटकार मारले. तोपर्यंत त्यान आपल्या संघाला चांगल्या स्थितित आणले होते.
हेही वाचा : ‘रोहित-कोहली २०२७ च्या विश्वचषकात दिसणार नाहीत’, माजी भारतीय खेळाडूने वर्तवली भविष्यवाणी…
तत्पूर्वी दुसऱ्या दिवशी इंग्लंड धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. संघाची सुरवात फारसी चांगली झाली नाही. जसप्रीत बूमराहने जॅक क्रॉलीला ४ धावांवर असताना माघारी पाठवले. त्यानंतर आलेला ऑली पोप आणि बेन डकेट यांनी डाव सावरला. बेन डकेट ६२ धावांवर बूमराहचा शिकार ठरला. त्यानंतर आलेला इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने थोडे स्थिरावण्याचा प्रयत्न केला परंतु त्यालाही बूमराहने २८ धावांवर असताना त्याला माघारी पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या शेवटी ऑली पोपने शतक साजरे केले. दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंड संघाने तीन गडी गमावून २०९ धावा केल्या होत्या.
इंग्लंडने २०९ पासून पुढे सुरवात केली. या दरम्यान बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूक यांनी डाव पुढे नेला. त्यानंतर मोहम्मद सिराजने बेन स्टोक्सला माघारी पाठवले. बेन स्टोक्सने ५२ चेंडूत २० धावा केल्या. त्यानंतर यष्टीरक्षक जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रूक यांनी डाव सावरला. जेमी स्मिथने काही आक्रमक फटके खेळले. त्याने हॅरी ब्रूकला चांगली साथ दिली. जेमी स्मिथ ४० धावांवर प्रसिद्ध कृष्णाचा शिकार ठरला. तर ब्रूक ९९ धावांवर बाद केले. त्यानंतर मैदानात ख्रिस वोक्स(३८) आणि ब्रायडन कार्स(२२) आक्रमक सुरवात केली. कार्सला मोहम्मद सिराजने तर वोक्सला जसप्रीत बूमराहने आऊट केले. जोश टंगला बूमराहने बाद करून इंग्लंडची पारी संपवली. तर शोएब बशीर १ वर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बूमराहने सर्वाधिक ५ विकेट्स मिळवल्या. तर प्रसिद्ध कृष्णाने ३ विकेट आणि मोहम्मद सिराजने २ विकेट्स घतेल्या तर रवींद्र जाडेजाला मात्र विकेट मिळवता आली नाही.
हेही वाचा : IND Vs ENG : Rishabh Pant एक्सप्रेस सुसाट! विकेटमागे केला भीम पराक्रम, असे करणारा ठरला तिसरा भारतीय
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक/उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बूमराह.