Samaresh Jung : मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे राष्ट्रीय पिस्तूल नेमबाजी प्रशिक्षक समरेश जंग यांचे घर कधीही जमीनदोस्त होऊ शकते. ऑलिम्पियन समरेश जंग हे नवी दिल्लीतील सिव्हिल लाईन्समधील खैबर पास परिसरात राहतात. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या जमीन आणि विकास कार्यालयाने (LNDO) समरेश जंग आणि इतर अनेक रहिवाशांना नोटिसा बजावल्या आहेत. ज्या जमिनीवर खैबर पास कॉलनी आहे ती जमीन संरक्षण मंत्रालयाची आहे आणि त्यामुळे ती बेकायदेशीर असल्याचा दावा या नोटिशीत करण्यात आला आहे.
ऑलिम्पियन असलेल्या खेळाडूच्या पत्नीने माध्यमांसमोर व्यक्त केली व्यथा
VIDEO | "We have received a notice that our house will be demolished in the next two days. How can people vacate their houses in just two days? Besides, there is no clarity in the notice that has been issued," says former India shooter Anuja Jung, wife of Samaresh Jung.
Samaresh… pic.twitter.com/K2gk9ISR0V
— Press Trust of India (@PTI_News) August 1, 2024
ऑलिम्पियन म्हणून त्याला किमान सन्माननीय निरोपाची अपेक्षा
बीजिंग 2008 ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या जंगने सांगितले की, ऑलिम्पियन म्हणून त्याला किमान सन्माननीय निरोपाची अपेक्षा आहे, तसेच या प्रकरणावर स्पष्टतेसह किमान दोन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे आवाहनही केले. प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अर्जुन पुरस्कार विजेते समरेश जंग म्हणतात की, ही तोडफोड का होत आहे हे मला माहीत नाही. लोकांची घरे का पाडली जात आहेत? त्यांनी अचानक संपूर्ण वसाहत बेकायदेशीर घोषित केली. काल रात्री आम्हाला सांगण्यात आले की आम्हाला दोन दिवसात जागा सोडायची आहे. माझे कुटुंब गेल्या 75 वर्षांपासून येथे राहत आहे. १९५० पासून आम्ही येथे रहिवासी आहोत. आम्ही न्यायालयात जाऊन याचिकाही दाखल केली, पण ती फेटाळण्यात आली.
VIDEO | Locals staged protest near Civil Lines Police Station in Delhi earlier tonight over a demolition notice issued by the land and development department.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/czJA25eh0f
— Press Trust of India (@PTI_News) August 1, 2024
दोन पदके जिंकल्यानंतर खूप उत्साहात असलेल्या खेळाडूने व्यक्त केली नाराजी
समरेशने गुरुवारी रात्री X वर पोस्ट केले, ‘भारतीय नेमबाजांनी दोन ऑलिम्पिक पदके जिंकल्यानंतर मी खूप उत्साहात घरी परतलो, पण निराशाजनक बातमी मिळाली की माझे घर आणि संपूर्ण परिसर दोन दिवसांत उद्ध्वस्त केला जाईल. जंग शेवटी म्हणाले, ‘एक ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त असल्याने, किमान मला आशा आहे की समुदायाला देखील सन्माननीय एक्झिट मिळेल. मी या प्रकरणाची स्पष्टता आणि योग्य पद्धतीने स्थलांतरित होण्यासाठी किमान दोन महिन्यांची विनंती करतो.