राज्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार? 'हे' कारण ठरतंय चर्चेचं (File Photo : Teachers)
मुंबई : राज्यात हजारो शिक्षक कार्यरत आहेत. आगामी 2025-26 या शैक्षणिक सत्राची शिक्षक संचमान्यता आधार-आधारित विद्यार्थी संख्येवरच केली जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांची आधार पडताळणी (व्हॅलिडेशन) पूर्ण करण्यासाठी केवळ 20 दिवस शिल्लक आहे. असे असताना राज्यातील तब्बल सात लाख विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अवैध ठरले आहेत. आता त्यांचे आधार दुरूस्त करून व्हॅलिडेशन न झाल्यास शेकडो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची भीती आहे.
येत्या 30 सप्टेंबरपर्यंत शाळेत दाखल असलेली विद्यार्थी संख्या ग्राह्य धरून शिक्षण विभाग शिक्षकांची पदे मंजूर करतो. मात्र, ही संचमान्यता होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड असणे आणि ते यूआयडीएआय या प्राधीकरणाकडून ‘व्हॅलिड’ होणे आवश्यक आहे. याच व्हॅलिडेशनच्या प्रक्रियेदरम्यान तब्बल सात लाख विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक इनव्हॅलिड ठरले आहेत. त्यामुळे तेवढे विद्यार्थी पटावर असले तरी ते आता शिक्षक संचमान्यतेसाठी ग्राह्य धरले जाणार नाहीत.
राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध शाळांमध्ये एकंदर २ कोटी ४ लाख ६३ हजार ३९२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ५ सप्टेंबरपर्यंत यापैकी १ कोटी ९१ लाख ३५ हजार २९६ विद्यार्थ्यांची नावे आधार प्राधिकरणाकडील माहितीशी जुळत असल्याने वैध ठरली आहेत. हे प्रमाण ९३.५१ टक्के आहे. गंभीर म्हणजे, राज्यातील ५ लाख २७हजार ६०२ विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड उपलब्ध नाहीत. तर ६३ हजार ९ तसेच, ७ लाख ३७ हजार ४८७विद्यार्थ्यांचे आधार अवैध ठरले आहेत.
आता शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे, ज्यांचे कार्ड आहे पण त्यावर चुकीची माहिती आहे, त दुरूस्ती करणे या कामांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. पण लाख विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे हे काम इतक्या कमी दिवसात कसे पूर्ण होणान असा प्रश्न शिक्षकांमधून उपस्थित केल जात आहे.
आधारकार्ड मशीनवरच राहणार शाळांची भिस्त
सेतू केंद्रात जाऊन विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे किंवा त्यात दुरूस्ती करणे हे वेळखाऊ काम आहे. त्यात शाळांना पालकांचे सहकार्यही मिळत नाही. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळांसाठी ८१६ आधार नोंदणी संच (आधार एनरॉलमेन्ट किट) दिले आहेत. या मशीन गटसाधन केंद्राच्या ठिकाणी उपलब्ध राहणार असून संबंधित गटातील केवळ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे काम होणार आहे. आता या मशीनवरच संपूर्ण शाळांची भिस्त आहे.