Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; रविवारी आपला कर्णधार खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

One Day Series : सरावादरम्यान दुखापतग्रस्त झालेला वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिलबाबत फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी संघ निवडीसह रवींद्र जडेजाच्या संघातील निवडीवरही भाष्य केले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 26, 2026 | 08:10 PM
One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; आपला कर्णधार रविवारी खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

One Day Series : क्रिकेट चाहत्यांनो; आपला कर्णधार रविवारी खेळणार, दुखातग्रस्त शुभमन गिलबाबत समोर आली मोठी माहिती

Follow Us
Follow Us:

 

  • फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांची पत्रकार परिषद
  • शुभमन गिलबाबत दिली महत्त्वाची माहिती
  • संघातील जडेजाच्या भूमिकेवरही केलं भाष्य
रविवारी भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यात वनडे मालिकेतील (One Day Series) पहिला सामना रंगणार आहे. अशात फलंदाज प्रशिक्षक सितांशू कोटक (Sitanshu Kotak) यांनी भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, भारतीय कर्णधार शुभमन गिलला (Shubhaman Gill) कोणतीच गंभीर दुखापत नसून तो रविवारी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात खेळण्यासाठी फिट आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज संघात 27 सप्टेंबर, 30 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी 3 सामन्यांची वनडे मालिका पार पडणार आहे. त्यानंतर 6 ते 17 ऑक्टोबरच्या काळात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. दरम्यान, शुक्रवारी सरावादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohmmad Siraj)चा उसळी घेणारा चेंडू गिलच्या उजव्या कोपऱ्याला लागून तो जायबंद झाला होता. त्यानंतर तब्बल 20 मिनिटापर्यंत मैदानातच त्याच्यावर उपचार चालले.

उपचारानंतर तो नेट्समध्ये थ्रोडाउन खेळण्यासाठी पुन्हा परतला. सामन्याआधीच्या पत्रकार परिषदेत कोटक पत्रकारांना म्हणाले की, मला वाटते की, तो ठीक असून खेळण्यास सज्ज आहे.

 

संघात प्रतिस्पर्धा वाढलीय

कोटक यांनी संघात वाढलेल्या प्रतिस्पर्धेबाबत भाष्य केले. सतत येणाऱ्या संघ निवडीबाबतच्या प्रश्नावर त्यांनी बोट ठेवला. यावेळी त्यांनी सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालवरही चर्चा केली, जो सर्व फॉर्मेटमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतरही नेहमीच संघाबाहेर बेंचवर बसलेला पाहण्यास मिळाला आहे.
गिल आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या उपस्थितीमुळे जयस्वालला जास्त वेळ संघाबाहेर रहावे लागते. कोटक म्हणाले की, मला वाटते की, संघात प्रतिस्पर्धा वाढली असून अनेक खेळाडूंची कामगिरी विश्वसनीय आहे. जयस्वालसोबतही असंच काहीसं घडत आहे. तसे असले तरी त्याच्या फलंदाजीतील कौशल्य, त्याचा सराव आणि मानसिक दृष्टीकोनाची आम्ही काळजी घेतो.
ते पुढे म्हणाले की, प्रशिक्षकही त्याच्याशी संवाद साधतात. परंतु समजा तुमच्या संघात तीन चांगले विकेटकीपर आहेत, तरी तुम्हाला त्यातील एकालाच खेळण्याची संधी घ्यावी लागते. असंच काहीसं सध्या त्याच्याबरोबर घडत असून हा खेळाचा भाग आहे.

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

अष्टपैलू जडेजाच्या भूमिकेवर भाष्य

कोटक यांनी अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या व्हाइट बॉलमधील भूमिकेबाबतही भाष्य केले, कारण त्याचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे, तर अक्षर पटेल एशियन गेम्स 2026 मुळे टी-२० संघात नाही आहे. ते म्हणाले की, मला वाटते की, निश्चितच तो संघात समाविष्ट होण्याचा प्रबळ दावेदार आहे. साउथ आफ्रिका मालिकेत जेव्हा अक्षरला ब्रेक देण्यात आलेला, तेव्हा जडेजाच खेळला होता.
जडेजा एक शानदार अष्टपैलू असल्याचे सांगत कोटक म्हणाले की, आपण त्याचे मागील रेकॉर्ड पाहू शकता. संघ कसा असेल आणि निवड समिती, कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक कोणत्याप्रकारे कॉम्बिनेशन निवडतात, ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्यासाठी योग्य वेळ येईल, पण माझ्या मते, जडेजा जगातील सर्वात चांगल्या क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे.

Virat Kohli: क्रिकेटविश्वात खळबळ! विराट कोहलीने करिअरबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला, ‘हा माझा शेवटचा…’

Web Title: One day series one day series captain subhuman gill injuries braking news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • bcci
  • Rohit Sharma
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11
1

IND vs WI: रोहित- विराट पुन्हा मैदानात! पहिल्या वनडेत जैस्वाल OUT, ऋतुराज IN? पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing 11

IND vs WI: भारतीय संघाला मोठा धक्का! शुभमन गिल झाला जखमी, खेळू शकणार का पहिला ODI सामना?
2

IND vs WI: भारतीय संघाला मोठा धक्का! शुभमन गिल झाला जखमी, खेळू शकणार का पहिला ODI सामना?

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण
3

IPL 2027 च्या ऑक्शनची तयारी सुरू! तीन वर्षांनंतर भारतात होणार लिलाव; BCCI ने ठरवलं ठिकाण

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
4

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.