IND vs NZ: Openers Rohit Sharma-Shubman Gill away from Indian team before Champions Trophy final; What exactly happened? Watch Video
Champion Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना 9 मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. त्यापूर्वीच एक मोठी बातमी समोर आली आहे. फायनल सामन्यात विजय मिळविण्याच्या इराद्याने भारत मैदानात उरणार आहे.परंतु, फायनलपूर्वीच कर्णधार रोहित आणि उपकर्णधार शुभमन गिल टीम इंडियाच्या संघापासून वेगळे झालेले दिसून आले आहेत. स्टेडियममध्ये ते सोबत पोहोचले नसल्याची माहिती मिळत आहे. नेमकं असे काय घडले? हा प्रश्न सर्वांसमोर उभा राहीला आहे.
भारतीय क्रिकेट संघ 8 महिन्यांत दुसरे आयसीसी जेतेपद जिंकण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरी करत गेल्या वर्षी जूनमध्ये T20 विश्वचषक 2024 च्या विजेतेपदावर नाव कोरले होते. आता पुन्हा कर्णधार शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्याच्या इराद्याने मैदानात उतरण्यास सज्ज झालीय आहे. पण, त्याआधीच कर्णधार आणि उपकर्णधार तीन इंडियापासून वेगळे झाल्याचे समोर आले आहे.
दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. रविवारी 9 मार्च रोजी भारत न्यूझीलंडसोबत भिडणार आहे. या फायनल सामन्यापूर्वी टीम इंडियाकडून सलग दोन दिवस दुबईत सराव करण्यात आला. शनिवारी, सामन्याच्या एक दिवस आधी, टीम इंडिया सरावासाठी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पोहोचली आणि तेथे भरपूर घाम गाळत सराव केला. पण टीम इंडिया इथे पोहोचली तेव्हा कर्णधार रोहित आणि उपकर्णधार गिल एकत्र दिसून आले नाहीत. या मागचे कारण असे कि, त्यापूर्वी ते दोघेही आयसीसी अकादमीमध्ये सराव करत होते.
Behind a successful team is a bunch that works tirelessly to help #TeamIndia prepare for Match Day 💪🏻
A day before the grand finale, we take a sneak peak into the 𝙏𝙚𝙖𝙢 𝙗𝙚𝙝𝙞𝙣𝙙 𝙩𝙝𝙚 𝙏𝙚𝙖𝙢 🙌
WATCH 🎥🔽 #INDvNZ | #ChampionsTrophy https://t.co/8gf9PWdS9A
— BCCI (@BCCI) March 8, 2025
एका वृत्तानुसार, टीम इंडियाच्या या सलामीच्या जोडीने दुबईतील स्टेडियमपासून दूर आयसीसी अकादमीमध्ये सोबत वेळ घालवला. यादरम्यान दोघांकडून फलंदाजी प्रशिक्षक सितांशु कोटक आणि सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्या देखरेखीखाली सराव करण्यात आला. दोघांनीही काही काळ येथे तयारीला वेळ दिला आणि काही वेळानंतर दोघेही दुबई स्टेडियमवर दाखल झाले. जिथे ते संघातील उर्वरित खेळाडूंसोबत सामील झालेले दिसून आले. भारतीय संघाकडून 2 वाजता सराव सुरू करण्यात आला होता, पण शर्मा आणि गिल दोघेही काही वेळानंतर तिथे दाखल झाले.
शर्मा आणि गिल या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे बघितले तर, चांगल्या सुरुवात दिल्यानंतर या दोघांकडून गेल्या २-३ सामन्यात काही फार जास्त धावा झाल्या नाहीत. शुबमन गिलने पहिल्याच सामन्यात शानदार शतक झळकावले होते, तर रोहितनेही त्या सामन्यात जोरदार फटकेबाजी करत 41 धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर या दोघांकडून एकही मोठी खेळी साकारण्यास यश आले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत हे दोघेही लवकर आपली विकेट देऊन बसले होते. अशा स्थितीत आता विजेतेपदाच्या सामन्यात रोहित आणि गिल यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.